पुणे। माजी भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव आयोजित एक्सप्लोझिव्ह व्हे करंडक स्पर्धेत बाद फेरीत पीवायसी हिंदू जिमखाना, डेक्कन जिमखाना, पुनित बालन-केदार जाधव क्रिकेट अकादमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदानावर आजपासून सुरू झालेल्या या दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत बाद फेरीत पहिल्या सामन्यात दिव्यांग हिंगणेकर(31धावा)याच्या खेळीच्या जोरावर पीवायसी हिंदू जिमखाना संघाने व्हेरॉक क्रिकेट अकादमीचा 3 गडी राखून पराभव केला. दुसऱ्या सामन्यात अथर्व काळे(31धावा)याने केलेल्या धावांच्या जोरावर पुनित बालन-केदार जाधव क्रिकेट अकादमी संघाने ब्रिलियंटस क्रिकेट अकादमीचा 4गडी राखून पराभव केला. तिसऱ्या सामन्यात डेक्कन जिमखाना संघाने पुना क्लब संघांचा 19 धावांनी पराभव केला.
स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना, डेक्कन जिमखाना, व्हेरॉक, पुनित बालन-केदार जाधव क्रिकेट अकादमी, ब्रिलियंटस क्रिकेट अकादमी, क्लब ऑफ महाराष्ट्र, केडन्स, पुना क्लब या सहा निमंत्रित संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे.
याआधी स्पर्धेचे उदघाटन आमदार रोहित पवार, माजी भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नंदन ठाकूर, अजिंक्य जोशी, सुनंदन लेले, मंदार भंडारी, ऋषिकेश हांडे, माजी रणजीपटू श्रीकांत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: बाद फेरी:
व्हेरॉक क्रिकेट अकादमी: 5षटकात 2बाद 66धावा(किरण मोरे नाबाद 20(9,4×4), मनोज यादव 17(11), वैभव आगम 14) पराभूत वि.पीवायसी हिंदू जिमखाना: 4.5षटकात 2बाद 67धावा(दिव्यांग हिंगणेकर 31(15,3×4,2×6), रोहन दामले 14, आदित्य लोंढे नाबाद 14, सोहन जमाले 1-10);सामनावीर-दिव्यांग हिंगणेकर; पीवायसी संघ 3 गडी राखून विजयी;
ब्रिलियंटस क्रिकेट अकादमी: 4.5षटकात 5बाद 66धावा(प्रज्वल घोडके 19, आनंद ठेंगे 22(10,2×4,2×6), महेश पाटील 15, अक्षय दरेकर 2-8)पराभूत वि.पुनित बालन-केदार जाधव क्रिकेट अकादमी: 3.5षटकात 1बाद 68धावा(अथर्व काळे 31(11,3×4,2×6), प्रीतम पाटील 28, महेश पाटील 1-10);सामनावीर-अथर्व काळे;
डेक्कन जिमखाना: 5षटकात 3बाद 93धावा(अजय बोरुडे नाबाद 30(12,2×4,2×6), अनिश करंदीकर 16, यश बोरामनी 14, हर्ष सांघवी 10, अजिंक्य नाईक 1-13)वि.वि.पुना क्लब: 5षटकात 1बाद 74धावा(यश नाहर 30(16,3×4,2×6), सागर बिरद्वाडे 31(11,1×4,4×6),);सामनावीर-अजय बोरुडे; डेक्कन जिमखाना संघ 19 धावांनी विजयी.
महत्त्वाच्या बातम्या –