दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी आणि टी20 संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. 35 वर्षीय डू प्लेसिसने क्विंटॉन डिकॉकच्या नेतृत्वाखालील युवा संघाला पुढील गोष्टी सोयीस्कर होण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
मागील महिन्यातच डिकॉकला दक्षिण आफ्रिकेच्या वनडे संघाचे कर्णधार करण्यात आले होते. आता डू प्लेसिसने कसोटी आणि टी20 संघाचे कर्णधारपद सोडल्याने या संघांचे नेतृत्वही डिकॉकलाच देण्यात येण्याची दाट शक्यता आहे. नुकत्याच इंग्लंड विरुद्ध झालेल्या टी20 मालिकेत डू प्लेसिसला विश्रांती दिल्याने त्याच्या अनुपस्थितीत डिकॉकने टी20 संघाचे प्रभारी कर्णधारपद सांभाळले होते.
BREAKING!
Faf du Plessis has announced he is stepping down as South Africa captain from all formats! pic.twitter.com/ukBYGgduiX
— ICC (@ICC) February 17, 2020
दक्षिण आफ्रिकेने जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात डू प्लेसिसने म्हटले आहे की ‘या सुंदर खेळाच्या तीन्ही प्रकारात माझ्या देशाचे प्रतिनिधित्व आणि नेतृत्व करण्याच्या मिळालेल्या मोठ्या सन्मानाचा विचार करण्यासाठी विश्रांतीच्या मागील काही आठवड्यांमध्ये मला अनेक दृष्टीकोन मिळाले.’
‘कर्णधारपद कधीकधी फायद्याचे ठरते, कधीकधी कठीण असते आणि कधीकधी हा मार्ग एकट्याचा आहे, पण या अनुभवाची जागा कोणीही घेऊ शकत नाही, कारण यामुळे मी आज माझा मला अभिमान वाटावा असा व्यक्ती बनलो.’
‘हा निर्णय कठिण होता, पण मी क्विंटॉन, मार्क बाऊचर आणि माझ्या संघसहकाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध राहिल,’ असेही डूप्लेसिस म्हणाला.
तसेच डूप्लेसिस म्हणाला, ‘मला उर्वरित मोसमात कसोटी संघाचे तसेच टी20 विश्वचषकात नेतृत्व करायला आवडले असते. परंतू कधीकधी एका कर्णधाराचे सर्वात महत्त्वाचे गुण म्हणजे नि: स्वार्थ असणे. मी अजूनही निरोगी, तंदुरुस्त, उत्सुक आहे आणि जोपर्यंत माझ्यात संघाला विजय मिळवून देण्याची कामगिरी करण्याची क्षमता आहे तोपर्यंत मी संघात महत्त्वाची भूमिका निभावेल.’
त्याचबरोबर डूप्लेसिस पुढे म्हणाला, ‘दक्षिण आफ्रिकेने नव्या युगात प्रवेश केला आहे. नवीन नेतृत्व, नवीन चेहेरे, नवी आव्हाने आणि नवीन रणनीती. सध्या मी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात खेळाडू म्हणून खेळण्यासाठी आणि माझ्याकडे असणारे ज्ञान आणि वेळ नवीन कर्णधाराला देण्यासाठी वचनबद्ध आहे.’
त्याचबरोबर डू प्लेसिसने त्याच्या कुंटुंबाचे, संघसहकाऱ्यांचे, दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचे आभार मानले आहेत.
दक्षिण आफ्रिकेने डूप्लेसिसच्या नेतृत्वाखाली तिन्ही प्रकारात मिळून 112 सामने खेळले. यामध्ये 39 वनडे, 36 कसोटी आणि 37 टी20 सामन्यांचा समावेश आहे. वनडेमध्ये त्याच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने 28 सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच 10 सामन्यात त्यांना पराभव स्विकारावा लागला आहे. तर 1 सामन्याचा निकाल लागलेला नाही.
तसेच कसोटीत त्याच्या नेतृत्वाखाली 18 विजय मिळवले आहेत, तर 15 पराभव स्विकारले आहेत. तसेच 3 सामने अनिर्णित राहिले आहेत. टी20मध्ये दक्षिण आफ्रिकेने त्याच्या नेतृत्वाखाली 23 विजय मिळवले असून 13 पराभव स्विकारले आहेत आणि 1 सामना बरोबरीत सुटला आहे.
सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यापर्यंत पोहचलेला एबी!!
वाचा????https://t.co/koufOhUtA3????#म #मराठी #Cricket #HappyBirthdayABD @ABdeVilliers17— Maha Sports (@Maha_Sports) February 17, 2020
वाढदिवस विशेष: एबीची क्रेझ एवढी की पठ्ठ्याने बैलाच्या पाठीवर काढली एबीची नक्षी
वाचा????https://t.co/58VZblCX0n????#म #मराठी #Cricket #HappyBirthdayABD @ABdeVilliers17— Maha Sports (@Maha_Sports) February 17, 2020