दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्सचा सदस्य फाफ डू प्लेसिसने कॅप्टन कूल एमएस धोनीबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. त्याने धोनीच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. परंतु याबरोबरच त्याने हेदेखील सांगितले की, धोनी कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही.
फाफ (Faf Du Plessis) म्हणाला की, धोनी पारंपारिक नेतृत्त्वापेक्षा वेगळा आणि उत्कृष्ट नेतृत्वकर्ता आहे. त्याची सर्वात मोठी ताकद म्हणजे मैदानावरील परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळणे आहे.
धोनीला (MS Dhoni) विश्वास नसलेल्या गोष्टीबद्दल खुलासा करताना फाफ म्हणाला की, “धोनीला संंघाच्या बैठकींवर विश्वास (Believe) नाही. तो खूप नैसर्गिक प्रकारचा कर्णधार आहे. त्याला क्रिकेटचे इतके चांगले ज्ञान आहे की मैदानावर योग्य निर्णय घेताना संघातील सहकारी त्याच्यावर अवलंबून राहतात.”
फाफ म्हणाला की, “मी आतापर्यंत ज्यांच्याबरोबर खेळलो आहे. त्यांच्यात धोनी सर्वोत्तम ‘फिनिशर’ आहे. तसेच तो खूप शांत आहे. मी त्याच्यापेक्षा उत्कृष्ट फिनिशरबरोबर खेळलोच नाही. मैदानावर त्याला पाहणे अप्रतिम क्षण असतो.”
“जर कोणीही त्याच्यासारखा बनण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याला त्याच्यासारखे करता येणार नाही. तो खूप वेगळा आहे. जसे तो चेंडूला खूप वेळानंतर हिट करतो. जो त्याचा शांत स्वभाव दाखवतो. त्याला आपल्या खेळाबद्दल माहित आहे. तसेच तो गोलंदाजाला आपल्या मर्जीप्रमाणे फटकेबाजी करतो,” असेही फाफ पुढे म्हणाला.
फाफने २०११पासून आयपीएल (IPL) खेळण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर तो धोनीबरोबर खूप वेळ घालवला आहे. तसेच तो सीएसकेच्या (Chennai Super Kings) यशस्वी प्रवासाचा महत्त्वाचा भाग राहिला आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-IPL नाही म्हणून काय झाले, आता होणार IPLपेक्षाही वेगवान लीग; तीदेखील लाॅकडाऊनमध्ये
-ते दृष्य पाहुन केविन पीटरसनला आला राग, म्हणाला निव्वळ मुर्खपणा आहे
-४ असे भारतीय खेळाडू, जे आपल्या शेवटच्या मालिकेत ठरले सुपर फ्लाॅप