कुस्तीविश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुण्यातील प्रसिद्ध कुस्तीपटू स्वप्निल ज्ञानेश्वर पाडाळे याचे बुधवारी (दि. 8 मार्च) निधन झाले आहे. स्वप्निलने हृदयविकाराच्या झटक्याने जगाचा निरोप घेतला. स्वप्निल हा मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलनातील पैलवान होता. स्वप्निलच्या निधनाने कुस्तीविश्वावर शोककळा पसरली आहे.
बुधवारी सकाळी साडे सातच्या सुमारास मुळशी तालुक्यातील मारुंजी येथील तालमीत व्यायाम करत असताना स्वप्निल पाडाळे (Swapnil Padale) याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. या झटक्यानंतर तो अचानक खाली पडला. त्याला जमिनीवर कोसळल्याचे पाहून इतर सहकाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच त्याचे निधन झाले होते. विशेष म्हणजे, स्वप्निल हा ‘महाराष्ट्र चॅम्पियन’देखील होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादवचा बृजभूषण यांना पाठिंबा; म्हणाला, “हरियाणाच्या कुस्तीपटूंनी कट…”
कुस्तीपटूंच्या आरोपांनंतर क्रीडा मंत्र्यांनी मांडले 3 प्रस्ताव, भेटीदरम्यान नेमकं काय घडलं?