भारत आणि न्यूझीलंड संघ खेळत असलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचा निकाल बुधवारी (२३ जून) लागेल. या अखेरच्या दिवशी विजयाचे पारडे कोणत्याही संघाकडे झुकू शकते. सामन्याच्या पाचव्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडचा डाव २४९ धावांवर संपवत भारताला या सामन्यात पुनरागमन करून दिले. मात्र, न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने भारतीय गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला होता. त्यावेळी एका चाहत्याने चक्क यासाठी बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याच्याकडे मदत मागितली.
चाहत्याने मागितली मदत
न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन या ऐतिहासिक सामन्यात पहिल्या डावांमध्ये अतिशय चिवट फलंदाजी करत होता. त्याला बाद करण्यासाठी भारतीय कर्णधार सातत्याने गोलंदाजीमध्ये बदल करत होता मात्र त्यांना यश लाभत नव्हते. त्यावेळी एका चाहत्याने चक्क बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याला ट्विटरवर विलियम्सनला बाद करण्याविषयी मदत मागितली. या चाहत्याने ट्विट करत लिहिले, ‘सोनू सूदजी विलियम्सन याला तंबूत पाठवा.’
सोनू सूद याने लॉकडाऊनमध्ये अनेक लोकांना आपल्या घरी पोहोचविण्यासाठी मदत केली होती. तोच धागा पकडत चाहत्याने असे ट्विट केलेले.
हमारी टीम में ऐसे दिग्गज हैं जो खुद ही भेज देंगे।
देखा, गया ना।🇮🇳 https://t.co/QLZ9aBy7rT— sonu sood (@SonuSood) June 22, 2021
सोनू सूदने दिले असे उत्तर
सोनू सूदने या चाहत्याला केन विलियम्सन बाद झाल्यानंतर उत्तर दिले. सोनूने हिंदीमध्ये ट्विट करताना लिहिले, ‘आपल्या संघामध्ये असे दिग्गज आहेत जे त्याला बाहेर पाठवतील. पाहिले ना’
सोनूच्या या ट्विटला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. केन विलियम्सनने १७७ चेंडूंचा सामना करताना ४९ धावांची खेळी केली. ईशांत शर्माने त्याला विराट कोहलीकडे झेल देण्यास भाग पाडले.
अखेरच्या दिवशी तिन्ही निकाल शक्य
कसोटी सामन्यासाठीचा निर्धारित पाच दिवसांचा वेळ २२ तारखेला आज संपन्न झाला आहे. मात्र, त्यापैकी दोन दिवस पावसामुळे एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नव्हता. याच कारणाने बुधवारी सामन्याच्या राखीव दिवशी खेळ होईल. यात भारताचा विजय, न्यूझीलंडचा विजय व अनिर्णित असे तीनही निकाल लागू शकतात.
महत्त्वाच्या बातम्या-
साउथम्पटनचं मैदान, २२ जूनचा दिवस अन् ४ बळी; मोहम्मद शमीचा जुळला जबरदस्त योगायोग
सोने दो मुझे… सेहवागने विलियम्सनच्या संथ फलंदाजीची उडवली खिल्ली, पाहून व्हाल लोटपोट
जेव्हा राखीव दिवशीही पावसाने केली होती फलंदाजी, भारताला संयुक्त जेतेपदावर मानावे लागले समाधान