हैद्राबाद। आज(12 मे) आयपीएल 2019चा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात सुरु आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात जो संघ विजयी ठरेल तो चौथ्यांदा आयपीएलचे विजेतेपद मिळवण्याचा इतिहास रचेल.
पण हा सामना सुरु होण्याआधी एका चाहत्याने चेन्नई सुपर किंग्सला रोखण्यासाठी मुंबई इंडियन्सला एक योजना सुचवली आहे. ही योजना कालपासून(11 मे) सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
या योजनेमध्ये या चाहत्याने 8 पॉइंट्स काढले आहेत. यामध्ये त्याने मुंबईला गोलंदाजीसाठी 6 पर्याय घेण्यास सुचवले आहे. यामध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेचा बुरान हेंड्रीक्सलाही 11 जणांच्या संघात संधी देण्यास सुचवले आहे.
तसेच त्याने मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला गोलंदाज म्हणून हार्दिक पंड्याचा कसा वापर करावा हे देखील सुचवले आहे. या चाहत्याच्या योजनेप्रमाणे पंड्याने 8 चे 16 षटकांदरम्यान गोलंदाजी केली पाहिजे.
ही योजना चेन्नई सुपर किंग्सने ट्विट करत त्यांचे प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंगला याबद्दल सुचित केले आहे. चेन्नईने ट्विट केले आहे की ‘चाहत्याने चेन्नई सुपर किंग्सला रोखण्यासाठी योजना बनवली आहे. त्याची माहिती फ्लेमिंग तूम्हाला देत आहोत.’
Fan made plan to tackle the #Yellove Brigade tomorrow! Bringing the infor-MI-tion to your notice, Super Coach @SPFleming7! ???? #WhistlePodu ???????? https://t.co/dDts0U3Rlg
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 11, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–आयपीएल २०१९: अंतिम सामन्यासाठी मुंबई-चेन्नईचे असे आहेत ११ जणांचे संघ
–चेन्नई सुपर किंग्स-मुंबई इंडियन्स आणि अंतिम सामना, असे आहे खास नाते…
–पराभवानंतरही श्रेयस अय्यरने जिंकली मने; धोनी, कोहली, रोहितबद्दल केले मोठे भाष्य