इंग्लंडमध्ये रविवारी (२६ जुलै) द ओव्हल मैदानावर चाहत्यांच्या उपस्थितीत एक मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना खेळण्यात आला. मार्चनंतर कोरोना व्हायरसदरम्यान असे पहिल्यांदाच झाले आहे. हा सामना सरे आणि मिडल सेक्स क्रिकेट क्लबमध्ये खेळण्यात आला होता. यामध्ये केवळ १ हजार चाहत्यांना प्रवेश देण्यात आला होता, ज्यांना सामाजिक अंतर लक्षात घेता लांब बसविण्यात आले होते.
सरे क्लबचे मुख्य अधिकारी रिचर्ड गाऊल्ड (Richard Gould) यांनी म्हटले की, २५ हजाराची क्षमता असणाऱ्या स्टेडिअममध्ये सामना पाहण्यासाठी १० हजार फोन आले होते. परंतु आम्ही केवळ १ हजार प्रेक्षकांना याची परवानगी दिली. फॅमिली ग्रूपमध्ये २ खुर्च्यांचे अंतर ठेवण्यात आले होते.
सरकारने आखली ऑक्टोबरमध्ये स्टेडिअम पूर्णपणे खुले करण्याची योजना
गाऊल्ड यांनी म्हटले, “ऑक्टोबरमध्ये प्रेक्षकांसाठी स्टेडिअम पूर्णपणे खुले करण्याची सरकारने योजना आखली आहे. ही केवळ एक चाचणी असेल. सामन्यादरम्यान २ स्टँडमध्ये एक पूर्ण लाईन मोकळी ठेवण्यात आली होती. संपूर्ण स्टेडिअममध्ये मार्गदर्शक तत्वांचे बॅनरही लावण्यात आले होते. मला आशा आहे की पुढेही सामने याच प्रकारे यशस्वी होतील आणि लोकांना सामने पाहता येतील. रविवारीही चाहत्यांमधील आनंद पहायला मिळत होता.”
या आठवड्यात आणखी २ स्पर्धांमध्ये प्रेक्षकांना चाचणीसाठी प्रवेश मिळेल
ते पुढे म्हणाले, सामन्यादरम्यान अनेक सरकारी, आरोग्य अधिकारी आणि सुरक्षा अधिकारी उपस्थित होते. त्यांनी संपूर्ण आढावा घेतला. आता ते याच्या पुढची योजना आखतील. या शुक्रवारपासून शेफील्डमध्ये जागतिक स्नूकर चॅम्पियनशीपही सुरु होणार आहे. त्या स्पर्धेतही चाचणी म्हणून काही प्रेक्षकांना प्रवेश दिला जाईल. याव्यतिरिक्त शनिवारी ग्लोरियस गुडवूड हॉर्स रेसिंगही होणार आहे. त्यामध्येही चाहत्यांना प्रवेश मिळेल.
इंग्लंडपासूनच झाली आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन
आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन इंग्लंड आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यातून झाले होते. ११७ दिवसांनंतर कोरोनादरम्यान ८ जुलैला साऊथँप्टनमध्ये इंग्लंड आणि वेस्ट इंडिज संघात कसोटी सामना खेळण्यात आला. दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची कसोटी मालिका प्रेक्षकांविना खेळण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी माजी क्रिकेटरने केली टीम इंडियाची निवड; पाहा कोणा-कोणाला दिले स्थान
-युवराज सिंगचा गंभीर आरोप; माझ्याबरोबर केला गेला गैरव्यवहार, असं नक्कीच अपेक्षित नव्हतं
-आयपीएल चाहत्यांसाठी खुशखबर! आता थेट मैदानात पाहता येणार सामने
ट्रेंडिंग लेख-
-आख्ख्या कसोटी करियरमध्ये एकही षटकार फलंदाजाला मारु न देणारे महारथी
-धीरज जाधव- गुणवत्ता असून देशासाठी खेळू न शकलेला महाराष्ट्राचा महारथी
-या ३ युवा खेळाडूंना आयपीएल २०२० स्पर्धा ५ महिने पुढे गेल्याने होणार फायदा