सूर्यकुमार यादवने नुकतेच मार्चमध्ये इंग्लंड विरुद्ध झालेल्या मालिकेत भारतीय संघासाठी पदार्पण केले होते. सूर्यकुमार आयपीएल 2021 मध्ये देखील शानदार फॉर्ममध्ये होता. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएल 2021 स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. स्पर्धा रद्द झाल्यामुळे सूर्यकुमार सध्या आपल्या घरी मुंबई येथे आहे. दरम्यान सूर्यकुमारने या फावल्यावेळेत चाहत्यांसोबतच प्रश्न उत्तराचे मजेशीर सत्र घेतले. यादरम्यान चाहत्यांनी त्याला अनेक प्रश्न विचारले. सूर्यकुमारने त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.
चाहत्यांनी सूर्यकुमारला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा आणि भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्यावर प्रश्न विचारले. चाहत्यांनी या प्रत्येक खेळाडूबद्दल सूर्यकुमारला एका शब्दात आपल्या भावना मांडण्यास सांगितले.
यावर उत्तर देताना सूर्यकुमारने विराटसाठी,” प्रेरणा,” हा शब्द वापरला आहे. तर धोनीसाठी सूर्यकुमारने “महान” हा शब्द वापरला. एका चाहत्याने त्याला रोहितबद्दल विचारले असता त्याने रोहितचे वर्णन “हिटमॅन” म्हणून केले आहे.
सूर्यकुमारला आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम खेळीबद्दल विचारले असता त्याने, इंग्लंडविरुद्धच्या टी20 सामन्यात जोफ्रा आर्चर विरुद्ध मारलेल्या षटकाराचा फोटो शेयर केला. सुर्यकुमारचा हा कारकिर्दीतील दुसराच आंतरराष्ट्रीय सामना होता. त्या सामन्यात त्याने 31 चेंडूत 57 धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 3 षटकार मारले होते.
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून शानदार कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमारने स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये देखील सातत्याने शानदार कामगिरी केली आहे. या कामगिरीचेच फळ म्हणून त्याला इंग्लंड विरुद्ध यावर्षी आपले आंतररष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी मिळाली.
सूर्यकुमारने इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेत तीन सामने खेळले होते. यापैकी त्याने दोन सामन्यांमध्ये फलंदाजी करताना 44.50 च्या सरासरीने 89 धावा केल्या होत्या. आगामी श्रीलंका दौऱ्यात सूर्यकुमारला प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
पायात घुसली होती बंदुकीची गोळी तरीही ‘तो’ आज खेळतोय क्रिकेट; विराटसारख्या फलंदाजाला केले होते त्रस्त
एकदिवसीय क्रिकेटमध्ये कर्णधार असताना सर्वोच्च खेळी करणारे ३ फलंदाज
“परदेशी खेळाडूविना आयपीएल स्पर्धा ही सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसारखीच असेल”