जागतिक क्रिकेटमध्ये विराट कोहली या नावाचं चांगलंच वजन आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगाने धावा करत विराटने स्वत:ची ‘रनमशीन’ अशी ओळख निर्माण केली आहे. विराटची गणना जगातील सर्वात प्रसिद्ध खेळाडूंमध्ये होते. विराट कुठेही जावो, चाहते त्याची पाठ सोडत नाहीत. असेच काहीसे पुन्हा एकदा पाहायला मिळाले. कोहली सरावासाठी जात असताना चाहते विराट-विराटचे नारे लावतात. यादरम्यानचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
विराट कोहली (Virat Kohli) सध्या भारतीय संघासोबत बंगळुरू (Bangalore) येथील अलूरमध्ये सराव करत आहे. भारतीय संघाने अलूर (Alur) येथे काही दिवसांच्या शिबिराचे आयोजन केले आहे. या ठिकाणी भारतीय संघाच्या खेळाडूंनी काही सराव सामनेही खेळले आहेत. या सरावादरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात चाहते विराट-विराट (Virat-Virat) बोलताना दिसत आहेत. व्हिडिओत दिसते की, विराट सरावानंतर जात असतो. यादरम्यान तो सुरक्षारक्षकांच्या घेऱ्यात असतो आणि चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी वेडेपिसे होताना दिसत आहेत.
Virat Kohli after the practice session today at Alur.
The Roar for King Kohli – The GOAT. pic.twitter.com/p47fnUMSMg
— Tanuj Singh (@ImTanujSingh) August 29, 2023
विराटची सोशल मीडियावर तुफान फॉलोव्हिंग
विराट कोहली सोशल मीडियावरील फॉलोव्हर्सच्या बाबतीत जगातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेटपटू आहे. इंस्टाग्रामवर त्याला 257 मिलियनहून अधिक चाहते फॉलो करतात. ही संख्या कोणत्याही क्रिकेटपटूच्या फॉलोव्हर्सच्या संख्येपेक्षा खूपच जास्त आहे. विराटचे इंस्टाग्रामवरील फॉलोव्हर्स आणि कमाई दोन्ही गोष्टी चर्चेत असतात. अलीकडेच एका रिपोर्टमध्ये, विराटच्या इंस्टाग्रामविषयी दावे करण्यात आले होते, जे स्वत: विराटने चुकीचे असल्याचे म्हटले होते. मात्र, विराट नेहमीच सोशल मीडियावर जाहिरात करताना दिसतो. इंस्टाव्यतिरिक्त तो एक्स (ट्विटर) या प्लॅटफॉर्मवरही सक्रिय असतो. त्याला इथे 57 मिलियनहून अधिक चाहते फॉलो करतात.
पाकिस्तानविरुद्ध करणार पुनरागमन
वेस्ट इंडिज दौऱ्यावर विराट कोहली कसोटी आणि वनडे मालिकेत दिसला होता. यानंतर त्याने काही दिवसांची विश्रांती घेतली होती. मात्र, आता त्याने आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेसाठी पुन्हा तयारीला सुरुवात केली. आता तो आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पहिल्या सामन्यातून मैदानावर पुनरागमन करेल. भारत विरुद्ध पाकिस्तान संघात 2 सप्टेंबर रोजी श्रीलंकेच्या कँडी येथे आशिया चषकाचा तिसरा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी विराटसोबतच क्रिकेटप्रेमीही चांगलेच उत्सुक आहेत. (fans chanted virat virat in bengaluru s alur after king kohli came out from stadium see video here)
हेही वाचलंच पाहिजे-
भारताच्या सर्वात मोठ्या समस्येवर द्रविडने तोडले मौन; म्हणाला, ’18-20 महिन्यांपूर्वीही मी…’
‘पाकिस्तानचा संघ भारतापेक्षा खूपच भारी, रोहित-विराटची तर…’, पाकिस्तानी क्रिकेटरचे बडेबोल