Loading...

तेरे पास किस बात का ऍटीट्यूड है भाई, ट्विटरकरांचे हार्दिक पंड्याला प्रश्न

भारताचा दिग्गज माजी वेगवान गोलंदाज झहिर खानचा 7 ऑक्टोबरला 41 वा वाढदिवस साजरा झाला. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी शुभेच्छा दिल्या आहेत.

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याने झहिरला ट्रोल करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

हार्दिकने झहिरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्याचा एका देशांतर्गत सामन्यात झहिरच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याचा व्हिडिओ शेअर केला होता आणि या व्हिडिओला कॅप्शन दिले होते की ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा झॅक. आशा आहे मी इथे जसा बाउंड्रीबाहेर चेंडू मारला तसा तूही मारशील.’

हार्दिकच्या या ट्विटवर क्रिकेट चाहते भडकले असून त्यांनी हार्दिकच्या या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. चाहत्यांनी हार्दिकला सन्मान द्यायला शिक असेही सुनावले आहे.

Loading...

हार्दिकच्या या ट्विटवर उत्तर देताना झहिरने म्हटले आहे की ‘धन्यवाद हार्दिक. माझे फलंदाजी कौशल्य तूझ्याइतके चांगले नाही पण माझा वाढदिवस तितकाच चांगला होता जसा मी या सामन्यात तूला पुढील चेंडू टाकला होता.’

हार्दिक सध्या लंडनमध्ये असून त्याच्यावर पाठीच्या दुखापतीमुळे नुकतीच काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या शस्त्रक्रियेमुळे त्याला 5 महिन्यांसाठी क्रिकेटपासून दूर रहावे लागण्याची शक्यता आहे.

हार्दिकने झहिरला दिलेल्या शुभेच्छांनंतर चाहत्यांच्या आल्या अशा प्रतिक्रिया – 

Loading...

Loading...

You might also like
Loading...