भारतीय संघ तसेच चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड हा या आयपीएल हंगामात उत्कृष्ट कामगिरी करताना दिसतोय. चेन्नईने आयपीएल 2023 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. संघाला त्याच्याकडून पुन्हा एकदा अशाच चमकदार कामगिरीची अपेक्षा असेल. मात्र त्याचवेळी त्याला आता काही चाहते त्याने घेतलेल्या एका निर्णयामुळे ट्रोल करताना दिसत आहेत.
जून महिन्याच्या मध्यावर महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने महाराष्ट्र प्रीमियर लीग आयोजित करण्याची घोषणा केली आहे. 15 जूनपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेत ऋतुराज गायकवाड, केदार जाधव व राहुल त्रिपाठी हे खेळाडू सहभागी होत आहेत. नव्याने आयोजित होत असलेल्या या स्पर्धेत सहा संघ खेळताना दिसतील. मात्र, ऋतुराजने घेतलेला हा निर्णय अनेकांना आवडलेला नाही. तुझ्याबरोबरचे अनेक क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत असताना तू अशा स्थानिक स्पर्धा खेळण्यात धन्यता मानतो, अशी टीका त्याच्यावर केली जातीये.
एका चाहत्याने लिहिले, शानदार आयपीएल हंगाम गाजवल्यानंतरही ऋतुराज गायकवाड महाराष्ट्र प्रीमियर लीग खेळणार आणि शुबमन गिल जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळेल.
त्याबरोबर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या स्टॅन्ड बायमधून त्याने आपले नाव मागे घेतले आहे. 3 जून रोजी ऋतुराज लग्न करत असल्याने तो या अंतिम सामन्यासाठी इंग्लंडला जाणार नाही. त्याच्या जागी यशस्वी जयस्वाल याला संधी दिली गेली आहे.
ऋतुराजची वैयक्तिक कामगिरी पाहिल्यास त्याने या हंगामात आतापर्यंत 14 डावांमध्ये 43.38 च्या सरासरीने 564 धावा केल्या आहेत. तो आपलाच सलामीचा सहकारी डेव्हॉन कॉनवेनंतर चेन्नई साठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. गुजरातविरुद्ध पहिल्या क्वालिफायरमध्ये त्याने 44 चेंडूवर 7 चौकार व एका षटकाराच्या मदतीने 60 धावा केल्या. यावेळी चेन्नईला पाचवे विजेतेपद मिळवून देण्याची महत्त्वाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर असेल.
(Fans Troll Ruturaj Gaikwad For Playing In Maharashtra Premier League And Quite WTC Final)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मानलं रे पठ्ठ्या! सराव सत्रातच दुबेचा राडा, IPL फायनलमध्ये होणार तांडव; मोठा विक्रम निशाण्यावर, Video
आयपीएल फायनलपूर्वीच सीएसकेच्या महत्वपूर्ण सदस्याने म्हटले ‘थँक्यू’, भावनिक पोस्ट शेअर करत लिहिले…