हरियाणाच्या सोनिपत जिल्ह्यातील नाहरी गावात जन्मलेल्या रवी दहियाने टोकियो ऑलम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवले आहे. पुरुषांच्या 57 किलो ‘फ्री स्टाइल’ प्रकारात खेळतांना त्याला अंतिम सामन्यात रशियाच्या झावूर युगवेवने ७-४ अशा फरकाने पराभूत व्हावे लागले. त्यामुळे तो रौप्य पदकाचा मानकरी ठरला. त्याचा हा विजय त्याच्यासह देशासाठी महत्त्वाचा ठरला आहे.
रवी अतिशय सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला मुलगा आहे. म्हणून त्याचा प्रवास तरुणांना प्रेरणादायी ठरणार आहे. रवीचे वडील शेतकरी आहेत. ते भाड्याने जमीन घेऊन शेती करतात. अतिशय कष्टाने त्यांनी रवीला मोठं केलं. रवीला लहानपणापासून कुस्तीची आवड होती. त्याला कुस्तीतच आपली कारकीर्द करायची होती. म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला छत्रसाल स्टेडियममध्ये प्रवेश घेऊन दिला. कारण त्याला कुस्तीचे चांगले डावपेच शिकता यावे, चांगले प्रशिक्षण मिळावे, ही त्यांची इच्छा होती.
छत्रसाल स्टेडियम ृमध्ये त्याची ओळख गुरू सतपाल यांच्याशी झाले. त्यानंतर ते त्याचे प्रशिक्षक देखील झाले. गुरू सतपाल हे नावाजलेले कुस्तीपटू होते. वयाच्या 22 व्या वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय कुस्तीत पदार्पण केले होते. त्याने आपला पहिला सामना वर्ल्ड चँपियनशिप खेळला होता. पुढे त्याने विविध स्पर्धात आपले नाव गाजवले. 2015 मध्ये आयोजित जूनियर वर्ल्ड चँपियनशिपमध्येही त्याने त्याच्या नावाचा डंका वाजवला होता. या स्पर्धेत त्याने रौप्य पदक पटकावले होते.
आता त्याने टोकियो आलम्पिकमध्ये ही रौप्य पदक मिळवले असल्याने त्याच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“मी विश्वासाने सांगू शकत नाही की विराट आयसीसी ट्रॉफी जिंकेल की नाही”
अशी २ कारणे, ज्यामुळे नॉटिंघम कसोटीत अश्विनला मिळायला पाहिजे होती संधी
टी-ट्वेंटी वर्ल्डकपचा सामना स्टेडियमवर जाऊन पाहाता येणार का? पाहा काय म्हणतायेत आयोजक