Loading...

हार्दिक पाठोपाठ आता या भारतीय क्रिकेटपटूवर लंडनमध्ये झाली शस्त्रक्रिया

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार मागील अनेक दिवसांपासून दुखापतीमुळे भारतीय संघातून बाहेर आहे. पण आता त्याच्यावर लंडनमध्ये स्पोर्ट हर्नियाची शस्त्रक्रिया झाली आहे. याबद्दल बीसीसीआयने माहिती दिली आहे.

Loading...

बीसीसीआयने त्याच्या शस्त्रक्रियेबाबत प्रसिद्धीपत्रकात माहिती दिली आहे की ‘वेगवान गोलंदाज भूवनेश्वर कुमार 9 जानेवारीला लंडनला गेला आहे. त्याच्यावर 11 जानेवारीला स्पोर्ट हर्नियाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.’

‘त्याला भारतीय संघाचे फिजिओथेरपिस्ट योगेश परमार यांनी मदत केली. भूवनेश्वर आता लवकरच भारतात परतेल आणि बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये रिहॅबिलिटेशनसाठी दाखल होईल.’

मात्र बीसीसीआयने तो कधीपर्यंत क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.

Loading...

तसेच पुढील आठवड्यात भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यातील टी20 मालिकेसाठीही भूवनेश्वरचा संघात समावेश नाही. त्याने आत्तापर्यंत 21 कसोटी सामने, 114 वनडे सामने आणि 43 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये मिळून त्याने 236 विकेट्स घेतल्या आहेत.

Loading...
Loading...

Loading...
You might also like
Loading...