क्रिकेटटॉप बातम्या

भल्याभल्या फलंदाजांना घाम फोडणाऱ्या ईशांतला ‘या’ धुरंधराने दिला सर्वात जास्त त्रास, स्वत:च सांगितले नाव

भारतीय संघाने जागतिक क्रिकेटला एकापेक्षा एक गोलंदाज दिले आहेत. यामध्ये वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा याच्या नावाचाही समावेश होतो. विरोधी संघाच्या फलंदाजांना धडकी भरवण्याचं काम ईशांतची भेदक गोलंदाजी करायची. ईशांतने भारताकडून कसोटीव्यतिरिक्त वनडे आणि टी20 क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, त्याला कसोटीत जास्त यश मिळाले, तर वनडे आणि टी20 संघातून तो आत-बाहेर होत राहिला. मात्र, ईशांतसाठी कोणत्या फलंदाजांचा सामना करणे सर्वात कठीण होते, याचे उत्तर स्वत: ईशांतनेच दिले आहे.

स्मिथ, रूट की विलियम्सन, कोण सर्वात आव्हानात्मक?
जिओ सिनेमावर ईशांत शर्मा (Ishant Sharma) याला विचारण्यात आले की, स्टीव्ह स्मिथ, जो रूट आणि केन विलियम्सन यांच्यापैकी कोणाविरुद्ध गोलंदाजी करणे सर्वात कठीण आहे? या प्रश्नाचे उत्तर देताना ईशांतने म्हटले की, ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ याच्याविरुद्ध गोलंदाजी करणे सर्वात कठीण आहे. ईशांत म्हणाला की, त्याने आतापर्यंत कारकीर्दीत जितक्या फलंदाजांना गोलंदाजी केली आहे, त्यामध्ये स्टीव्ह स्मिथ सर्वात आव्हानात्मक फलंदाज आहे.

हॅट्रिक चेंडूवर स्टीव्ह स्मिथला बाद करण्यावर ईशांतची प्रतिक्रिया
ईशांत शर्मा याने म्हटले की, जो रूट (Joe Root) आणि केन विलियम्सन (Kane Williamson) यांच्या तुलनेत स्मिथला गोलंदाजी करणे सर्वात कठीण आहे. याव्यतिरिक्त ईशांतने त्याच्या कसोटी हॅट्रिकवरही प्रतिक्रिया दिली. ईशांतने स्टीव्ह स्मिथला बाद करून आपली हॅट्रिक पूर्ण केली होती.

ईशांत म्हणाला की, “स्टीव्ह स्मिथला बाद करून हॅट्रिक घेणे माझ्यासाठी सर्वात चांगला अनुभव होता. हॅट्रिक चेंडूवर स्मिथला बाद करणे कोणत्याही स्वप्नापेक्षा कमी नव्हते.”

खरं तर, ईशांतने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यात ही हॅट्रिक घेतली होती. त्या सामन्यात हॅट्रिक चेंडूवर ईशांतने स्मिथला तंबूचा रस्ता दाखवला होता.

ईशांतची कारकीर्द
ईशांत शर्मा याच्या कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने भारतीय संघाकडून आतापर्यंत 105 कसोटी सामन्यातील 188 डावात गोलंदाजी करताना 3.16च्या इकॉनॉमीने 311 विकेट्स घेतल्या होत्या. 74 धावा खर्चून 7 विकेट्स ही त्याची कसोटीतील सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी होती. त्याने 11 वेळा एका डावात 5 विकेट्सही घेतल्या होत्या. तसेच, एका सामन्यात त्याने 10 विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता.

याव्यतिरिक्त ईशांतने 80 वनडे सामन्यात 115 विकेट्स, तर 14 टी20 सामन्यात 8 विकेट्स घेतल्या होत्या. (fast bowler ishant sharma picks steve smith is the most difficult batter to have ever bowled)

महत्त्वाच्या बातम्या-
जगातील सर्वोत्तम कर्णधार कोण? पाकिस्तानी खेळाडूने बाबर अन् इम्रान नाही, तर ‘या’ भारतीयाचे घेतले नाव
विक्रमवीर तिलक! पदार्पणाच्या सामन्यात दाखवला बॅटिंगचा दम, रोहितचा ‘तो’ मोठा रेकॉर्ड उद्ध्वस्त

Related Articles