---Advertisement---

आफ्रिदीच्या जावयाची इंग्लंडमध्ये हवा! डेब्यू सामन्यात पहिल्या दोन चेंडूवर चटकावल्या विकेट्स, Video

Shaheen-Afridi
---Advertisement---

जगातील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये पाकिस्तानी माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी याचा जावई आणि घातक वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याचाही समावेश होतो. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून ते टी20 लीग स्पर्धेपर्यंत सर्वत्र आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. बुधवारी (दि. 02 ऑगस्ट) इंग्लंडमधील ‘द हंड्रेड’ स्पर्धेत आफ्रिदीने पदार्पण केले. वेल्श फायर संघाकडून खेळताना त्याने दमदार कामगिरी केली. कार्डिफच्या सोफिया गार्डन्स मैदानावर खेळताना मॅनचेस्टर ओरिजिनल्स संघाविरुद्ध त्याने पहिल्याच षटकात भेदक गोलंदाजीचा नजारा दाखवला.

द हंड्रेड (The Hundred) स्पर्धेतील दुसरा सामना वेल्श फायर विरुद्ध मॅनचेस्टर ओरिजिनिल्स (Welsh Fire vs Manchester Originals) संघात पार पडला. पावसाच्या व्यत्ययामुळे 40 चेंडूंचा सामना खेळवण्यात आला. त्यामुळे हा सामना वेल्श फायर संघाने 9 धावांनी जिंकला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेल्श फायर संघाने 40 चेंडूत 4 विकेट्स गमावत 94 धावा केल्या होत्या. या अशाप्रकारे मॅनचेस्टर ओरिजिनल्स संघाला 40 चेंडूत 95 धावांचे आव्हान मिळाले होते.

मात्र, संघाने पहिल्या दोन चेंडूंवर 2 विकेट्स गमावल्या. यावेळी आपले पहिलेच षटक टाकत असलेल्या शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) याने पहिल्या चेंडूवर शानदार यॉर्कर टाकला आणि फिल सॉल्ट याच्या पॅडला चेंडू लागला. यावेळी शाहीनने अपील करताच पंचांनी फलंदाजाला बाद घोषित केले. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर लॉरी इव्हान्स या फलंदाजालाही पायचीत बाद केले. इव्हान्स आणि सॉल्ट यांनी खाते न खोलताच तंबूचा रस्ता पकडला. अशाप्रकारे आफ्रिदीने संघाला शानदार सुरुवात दिली.

गोलंदाजांच्या शानदार प्रदर्शनाच्या जोरावर वेल्श फायर (Welsh Fire) संघाने हा सामना 9 धावांनी जिंकला. आफ्रिदीने 10 चेंडू टाकताना 3 चेंडू निर्धाव टाकत 24 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट्स घेतल्या. त्याचाच पाकिस्तानी सहकारी गोलंदाज हॅरिस रौफ यानेही 10 चेंडू टाकत 15 धावा खर्च केल्या. त्याच्या चेंडूवर जोस बटलर याने 1 षटकारही खेचला होता. बटलर आणि मॅक्स होल्डन यांनी प्रत्येकी 37 धावांची खेळी साकारली. मात्र, त्यांचे प्रयत्न संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.

शाहीन आफ्रिदी हा पाकिस्तानी संघाच्या वेगवान गोलंदाजी फळीतील हुकमी एक्का आहे. यावर्षी होणाऱ्या आशिया चषक आणि विश्वचषक 2023 स्पर्धेत तो पाकिस्तानसाठी महत्त्वाचा खेळाडू असेल. अशात त्याच्या या प्रदर्शनाने पाकिस्तान संघाला आनंद झाला असेल. मात्र, विरोधी संघांसाठी ही चिंतेची बाब मानली जात आहे. (fast bowler shaheen shah afridi got wickets on his first two balls in the hundred see video)

महत्त्वाच्या बातम्या-
टी20 मालिकेत ‘या’ 5 भारतीय धुरंधरांवर असेल आख्ख्या जगाचे लक्ष, सुपरफॉर्ममधील खेळाडूकडून विंडीजला धोका
जेव्हा Insta DMमध्ये ब्रायन लाराचा मेसेज पाहून दंग झालेला ईशान, दिग्गजापुढेच सांगितला भावूक किस्सा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---