माउंट मोंगनूई। न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज संघात रविवारी(29 नोव्हेंबर) दुसरा टी20 सामना बे ओव्हल स्टेडियमवर झाला. या सामन्यात न्यूझीलंडचा 23 वर्षीय ग्लेन फिलिप्सने शतकी खेळी केली आहे. त्याच्या शतकी खेळीमुळे न्यूझीलंडने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 238 धावांचा टप्पा गाठला. फिलिप्सने ही शतकी खेळी करण्याबरोबरच खास विक्रमही केला आहे.
फिलिप्सने 46 चेंडूत त्याचे आंतरराष्ट्रीय टी20मधील पहिले शतक केले. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वात जलद शतक करणारा न्यूझीलंडचा क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी हा विक्रम कॉलिन मुन्रोच्या नावावर होता. मुन्रोने वेस्ट इंडिज विरुद्धच 2018 ला 47 चेंडूत शतकी खेळी केली होती.
फिलिप्सने रविवारी शतकी खेळी करताना 51 चेंडूत 10 चौकार आणि 8 षटकारांसह 108 धावांची खेळी केली. हे त्याचे त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधीलही पहिले शतक ठरले आहे.
फिलिप्स-डेवन कॉन्वेची विक्रमी भागीदारी –
फिलिप्स बरोबरच या सामन्यात कॉन्वेनेही शानदार खेळी केली. त्याने 37 चेंडूत नाबाद 65 धावा केल्या. याबरोबरच ग्लेन आणि फिलिप्सने तिसऱ्या विकेटसाठी 184 धावांची भागीदारी केली. यामुळे न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय टी20मध्ये कोणत्याही विकेटसाठी केलेली ही सर्वोच्च भागीदारी ठरली आहे. याआधी हा विक्रम मार्टिन गप्टील आणि केन विलियम्सनच्या नावावर होता. त्यांनी 2016 ला पाकिस्तानविरुद्ध नाबाद 171 धावांची भागीदारी केली होती.
न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वात जलद शतक करणारे क्रिकेटपटू –
46 – ग्लेन फिलिप्स, विरुद्ध वेस्ट इंडिज, 2020
47 – कॉलिन मुन्रो, विरुद्ध वेस्ट इंडिज, 2018
50 – ब्रेंडन मॅक्यूलम, विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2010
51 – ब्रेंडन मॅक्यूलम, विरुद्ध बांगलादेश, 2012
52 – कॉलिन मुन्रो, विरुद्ध बांगलादेश, 2017
महत्त्वाच्या बातम्या –
पाच नाही; सहा नाही, तब्बल १० देशांत कसोटी शतके करणारे जगातील २ फलंदाज
“रवींद्र जडेजासारखे खेळाडू वनडेसाठी योग्य नाही”, मांजरेकरांची पुन्हा टीका
निशामच्या खिल्लीवर मॅक्सवेलचे उत्तर, ‘मी केएल राहुलची माफी मागितली’