हॅमिल्टन। न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात आज पार पडलेल्या चौथ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडने 8 विकेट्स आणि 212 चेंडू बाकी ठेवत विजय मिळवला आहे. न्यूझीलंडच्या या विजयात ट्रेंट बोल्टने 21 धावा देत 5 विकेट् घेत मोलाचा वाटा उचलला आहे.
त्याने भारताच्या रोहित शर्मा, शिखर धवन, शुबमन गिल, केदार जाधव आणि हार्दिक पंड्या या महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या.
याबरोबरच त्याने वनडेत न्यूझीलंडमध्ये 100 विकेट्स घेण्याचा टप्पाही पार केला आहे. याबरोबरच तो न्यूझीलंडमध्ये सर्वात जलद 100 वनडे विकेट्सचा टप्पा पार करणारा गोलंदाजही ठरला आहे. तसेच न्यूझीलंडमध्ये वनडेत 100 विकेट्स घेणारा तो डॅनियल विट्टोरी नंतरचा दुसराच गोलंदाज आहे.
एका देशात सर्वात जलद 100 वनडे विकेट्स घेण्याऱ्या गोलंदाजांच्या यादीतही बोल्ट अव्वल क्रमांकावर आला आहे. त्याने न्यूझीलंडमध्ये त्याचा 49 वा सामना खेळताना 100 वनडे विकेट्सचा टप्पा पार केला आहे.
हा विक्रम याआधी वकार युनुस यांच्या नावावर होता. त्यांनी संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळताना 53 सामन्यात 100 वनडे विकेट्सचा टप्पा पार केला होता. त्यांच्या पाठोपाठ ग्लेन मॅकग्रा आणि ब्रेट ली आहे. यांनी ऑस्ट्रेलियामध्ये प्रत्येकी 56 सामन्यात 100 वनडे विकेट्स घेतल्या होत्या.
त्याचबरोबर बोल्टने वनडेमध्ये पाचव्यांदा 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा पराक्रमही केला आहे. त्यामुळे न्यूझीलंडकडून सर्वाधिक वेळा वनडे सामन्यात 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याच्या रिचर्ड हॅडली यांच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली आहे. हॅडली यांनीही पाच वेळा वनडेत 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
एका देशात सर्वात जलद 100 वनडे विकेट्स घेणारे गोलंदाज-
49 सामने – ट्रेंट बोल्ट – न्यूझीलंड
53 सामने – वकार युनुस – संयुक्त अरब अमिराती
56 सामने – ग्लेन मॅकग्रा / ब्रेट ली – ऑस्ट्रेलिया
60 सामने – शॉन पोलॉक – दक्षिण आफ्रिका
61 सामने – मखाया एनटीनी – दक्षिण आफ्रिका
62 सामने – वासिम अक्रम – संयुक्त अरब अमिराती
62 सामने – शेन वॉर्न – ऑस्ट्रेलिया
महत्त्वाच्या बातम्या-
–पराभवाचे कारण कर्णधार रोहित शर्माने केले स्पष्ट
–९६० वनडे खेळलेल्या टीम इंडियाच्या बाबतीत दुसऱ्यांदाच असे घडले…
–टीम इंडियाबाबतीत सातव्यांदाच घडले असे काही!