Sunday, January 29, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फीफाचा अर्जेंटिनाला धोका? नेमकं प्रकरण काय आहे, वाचा सविस्तर

फीफाचा अर्जेंटिनाला धोका? नेमकं प्रकरण काय आहे, वाचा सविस्तर

December 19, 2022
in टॉप बातम्या, फुटबॉल
FIFA World Cup

Photo Courtesy: Twitter/FIFA World Cup


नुकताच कतारमध्ये फीफा विश्वचषक 2022चा अंतिम सामना खेळवला गेला. या अंतिम सामन्यात फ्रान्स आणि अर्जेंटिना समोरासमोर होते. अर्जेंटिनाने फ्रान्सला पराभूत करत विश्वचषकावर आपले नाव कोरले आणि तिसऱ्यांदा हा किताब आपल्या नावावर केला. विश्वचषक जिंकल्यावर त्या चषकाचे चुंबन घेणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. मात्र, आता जी माहिती तुमच्या समोर येणार आहे, त्याने तुम्हाला आश्चर्य नक्कीच होईल.

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर विजेत्या संघाला जो चषक दिला जातो, त्याच्यामागे एक खूप रंजक गोष्ट आहे. रविवारी (दि. 18 डिसेंबर) खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यानंतर विजयी संघाला फक्त जल्लोष करण्यासाठी हा चषक देण्यात आला. पुरस्कार प्रदान समारंभानंतर मुळ चषक संघाकडून परत घेण्यात आला. म्हणजेच फीफा विश्वचषक जिंकूनही अर्जेंटिना संघ मुळ चषक घरी घेऊन गेलेला नाही. त्याऐवजी त्या चषकाचा बनावट चषक देण्यात आला. हा बनावट चषक कांस्य धातूचा असून त्यावर सोन्याचा थर दिलेला आहे.

फीफाचा मुळ चषक हा ज्युरीचममधील मुख्यालयात ठेवलेला असतो. हा चषक फक्त वर्ल्ड कप टूर आणि विश्वचषकाच्या सामन्यांवेळीच बाहेर काढला जातो. 2005मध्ये नियम बनवण्यात आला की विजेत्या संघाला मुळ चषक घेऊन जाता येणार नाही, मुळ चषकाऐवजी त्यांना त्या चषकाची बनावट देण्यात येईल. फुटबॉल विश्चवषकाची सुरुवात 1930मध्ये झाली होती. त्यावेळी विजेत्यांना जो चषक दिल्या गेला होता त्याचे नाव ज्यूल्स रिमेट ट्रॉफी होते. हा चषक 1970 पर्यंत विजेत्या संघाला देण्यात आला. त्यानंतर या चषकाला नवे रुप देण्यात आले.

यंदाच्या फीफा विश्वचषकावर अर्जेंटिना संघाने आपले नाव कोरले. चित्तथरारक अंतिम सामन्याचा शेवट पेनाल्टी शूटआऊटने झाला. पेनाल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सचा 4-2ने पराभव केला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जगजेत्या मेस्सीचा जन्म आसाममधील! काँग्रेस खासदाराच्या दाव्यानंतर सोशल मीडियावर खळबळ
युएईत दिसणार ‘पठाण पॉवर’! नव्या टी20 लीगमध्ये कॅपिटल्ससाठी दाखवणार टशन


Next Post
Photo Courtesy: Twitter/Karim Benzema

पराभव लागला जिव्हारी! वाढदिवशीच फ्रान्सचा स्ट्रायकर बेन्झेमाची‌ तडकाफडकी निवृत्ती

Photo Courtesy: Twitter

लईच चोपलयं! फक्त 13 वर्षांच्या पोराने पाडला 38 षटकार अन् 30 चौकारांचा पाऊस

Kerala Blasters FC

चेन्नईयन एफसीने कमबॅक केले, केरळा ब्लास्टर्सला बरोबरीत रोखले

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143