कतार येथे सुरू असलेल्या फिफा विश्वचषकात शनिवारी (10 डिसेंबर) तिसरा व चौथा उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळला गेला. तिसऱ्या सामन्यात या स्पर्धेत अनपेक्षित कामगिरी करत आलेल्या मोरोक्कोने ख्रिस्टीयानो रोनाल्डोच्या पोर्तुगालला 1-0 असे पराभूत करत पहिल्यांदाच उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर, चौथ्या सामन्यात गतविजेत्या फ्रान्सने विजयाचे दावेदार मानले जात असलेल्या इंग्लंडचा 2-1 असा पराभव करत पुन्हा एकदा अंतिम फेरीकडे वाटचाल केली.
The final four 🇫🇷 🇭🇷 🇦🇷 🇲🇦 #FIFAWorldCup #Qatar2022 pic.twitter.com/yRHBh6C7ZM
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 11, 2022
अल थुमामा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पोर्तुगाल विरुद्ध मोरोक्को सामन्यात पोर्तुगाल संघाला विजयाचे दावेदार मानले जात होते. सलग दुसऱ्या सामन्यात पोर्तुगाल संघाच्या मॅनेजरने अनुभवी ख्रिस्टियानो रोनाल्डो याला बाकावर बसवले. असे असले तरी पोर्तुगाल संघ आक्रमक खेळ दाखवत होता. पहिल्या हाफच्या अखेरीकडे खेळ चालला असतानाच, युसेफ एन नेसरी याने 42 व्या मिनिटाला गोल करत मोरोक्कोला आघाडीवर नेले. दुसऱ्या हाफमध्ये पोर्तुगालच्या आक्रमणाची धार आणखी वाढली. मात्र, त्यांना यश लाभले नाही.
रोनाल्डोला मैदानात उतरवल्यानंतरही पोर्तुगालला गोल करण्यात अपयश येत होते. अखेरच्या दहा मिनिटात मोरोक्को संघ 10 खेळाडूंसह खेळला. परंतु, मोरोक्कोने भक्कम बचाव करत त्यांना यश मिळू दिले नाही. या विजयासह उपांत्य फेरीत पोहोचणारा मोरोक्को पहिला आफ्रिकन संघ ठरला. तसेच, या पराभवामुळे रोनाल्डोच्या कारकिर्दीची अखेर विश्वचषकाविना झाली.
दुसऱ्या सामन्यात फ्रान्स आणि इंग्लंड या तुल्यबळ संघात चांगलेच घमासान रंगले. ऑरेलियन चौमेनीने 17 व्या मिनिटाला गोल करत फ्रान्सला आघाडीवर नेले. त्यानंतर इंग्लंड संघाने काही चांगले प्रयत्न केले. दुसऱ्या हाफमध्ये 54 व्या मिनिटाला इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनने पेनल्टीवर गोल करत सामना बरोबरीत आणला. 78 व्या मिनिटाला गिरूने शानदार गोल नोंदवत संघाला आघाडीवर नेले. शेवटी हीच आघाडी निर्णायक ठरली. या विजयासह फ्रान्सने सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे.
विश्वचषकातील पहिल्या उपांत्य सामन्यात अर्जेंटिना आणि क्रोएशिया अशी लढत होईल. तर, दुसऱ्या सामन्यात फ्रान्स मोरोक्कोचे आव्हान स्वीकारेल.
(FIFA World Cup Morocco And Into Semis Portugal England Out)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पीएमडीटीए- केपीआयटी- ओडीएमटी नटराज ब्रॉन्झ सिरिज टेनिस स्पर्धेत राज दर्डा, परी हेंगले यांना विजेतेपद
लिटन दासचे इशान किशनविषयी मोठे विधान, केएल राहुल म्हणाला…