कतार येथे सुरू असलेल्या फीफा विश्वचषक (FIFA World Cup) 2022चा अंतिम सामना रविवारी (18 डिसेंबर) फ्रांस विरुद्ध अर्जेंटिना (France vs Argentina) यांच्यात खेळला गेला. लुसेल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात अर्जेंटिना जिंकला. या लेखामध्ये आपण या स्पर्धेत आतापर्यंत कोणता संघ जिंकला आणि कोणत्या संघाने सर्वाधिकवेळा विश्वविजेता होण्याचा मान मिळवला हे पाहणार आहोत. या स्पर्धेला 1930 पासून सुरूवात झाली, ज्याचा पहिला हंगाम 13 संघामध्ये खेळला गेला होता.
फीफा विश्वचषक पहिल्यांदा जिंकण्याची कामगिरी उरुग्वेने केली. उरुग्वेने अंतिम सामन्यात अर्जेंटिनाचा 4-2 असा पराभव केला होता. त्यानंतर 2022पर्यंत 21 विश्वचषक खेळले गेले. ज्यामध्ये ब्राझील सर्वाधिक वेळा विजयी ठरला. त्यांनी विश्वचषकाच्या इतिहासत पाच वेळा चॅम्पियन होण्याचा विक्रम केला. या स्पर्धेचा शेवटचा विजेता फ्रांस होता, ज्यांनी 2018च्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात क्रोएशियाचा पराभव करत दुसऱ्यांदा विश्वचषक पटकावला होता. यावेळी मात्र अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रांसला पेनल्टी शूटआउटमध्ये मात देत विजय मिळवला. ही अर्जेंटिनाचा तिसरा विश्वचषक विजय ठरला.
उरुग्वेनंतर इटलीने दुसरा विश्वचषक जिंकला. 1934मध्ये झालेल्या या स्पर्धेत इटलीने अंतिम सामन्यात झेकोस्लोव्हाकियाचा 2-1 असा पराभव केला होता. त्यानंतर 1938ला झालेल्या स्पर्धेतही इटलीच विजेता ठरला. तर दुसऱ्या महायुद्धामुळे 12 वर्षांनंतर तिसरा विश्वचषक खेळला गेला. 1950च्या त्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात उरुग्वेने ब्राझीलचा 2-1 असा पराभव केला होता.
1958मध्ये खेळल्या गेलेल्या स्पर्धेत 17 वर्षीय पेलेने सहा गोल करत ब्राझीलला पहिला विश्वचषक जिंकून देण्यात महत्वाची भुमिका बजावली. 1962मध्ये ब्राझीलने पुन्हा एकदा चषकावर नाव कोरत इटलीची बरोबरी केली. 1966 मध्ये यजमान इंग्लंडने पहिल्यांदा विश्वचषकाचे जिंकला. इंग्लंडने लंडनच्या वेम्बले स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात वेस्ट जर्मनीचा 4-2 असा पराभव केला, त्यावेळी ‘फुटबॉल कम होम’ हे वाक्य प्रसिद्ध झाले होते. तेव्हापासून ते आतापर्यंत इंग्लंडने विश्वचषक जिंकलेला नाही.
ब्राझीलने पुन्हा एकदा 1970मध्ये विजेतेपदावर नाव कोरले. त्यावेळी ब्राझील तीन विश्वचषक जिंकणारा पहिला आणि एकमेव संघ ठरला होता. त्याचबरोबर त्या संघात पेले सुद्धा होते, ज्यामुळे ते कारकिर्दीत तीन विश्वचषक जिंकणारे पहिले आणि एकमेव खेळाडू ठरले. 1994मध्ये पहिल्यांदाच उत्तर अमेरिकेत विश्वचषक खेळवला गेला. तेथे ब्राझीलने चौथ्यांदा विजेतेपदावर नाव कोरले. 2006मध्ये इटलीच्या सेरी ए लीगमध्ये फिक्सिंगचे वादळ उठले होते, तरीही इटलीने उत्तम कामगिरी केली आणि अंतिम सामन्यात फ्रांसला पराभूत करत चौथ्यांदा विश्वचषक जिंकला.
फुटबॉल विश्वात स्पेनचे स्थान वेगळेच आहे, मात्र त्यांना पहिला विश्वचषक जिंकण्यासाठी 2010ची वाट पाहावी लागली. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेनने नेदरलॅंड्सला 1-0ने पराभूत केले. आधीच्या दोन्ही स्पर्धांच्या उपांत्य फेरीत पोहोचलेल्या मात्र अपयश हाती लागलेल्या जर्मनीने 2014मध्ये विश्वचषक जिंकला.
फुटबॉलचे विश्वविजेत्या संघांची यादी-
1930 – उरुग्वे
1934 – इटली
1938 – इटली
1950 – उरुग्वे
1954- वेस्ट जर्मनी (जर्मनी)
1958 – ब्राझील
1962 – ब्राझील
1966 – इंग्लंड
1970 – ब्राझील
1974 – वेस्ट जर्मनी (जर्मनी)
1978 – अर्जेंटिना
1982 – इटली
1986 – अर्जेंटिना
1990 – वेस्ट जर्मनी (जर्मनी)
1994 – ब्राझील
1998 – फ्रांस
2002 – ब्राझील
2006 – इटली
2010 – स्पेन
2014 – जर्मनी
2018 – फ्रांस
फुटबॉलचे सर्वाधिक वेळा विश्वविजेते ठरलेले (पुरूष संघ)-
ब्राझील – 5
इटली – 4
जर्मनी – 4
उरुग्वे – 2
अर्जेंटिना – 3
फ्रांस – 2
इंग्लंड -1
स्पेन -1
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विश्वचषकात फीफा वाटणार तब्बल 3641 कोटी, विजेत्या संघासोबत इतर टीमवरही पडणार पैशांचा पाऊस
पॉंटिंगने केलेली भविष्यवाणी खरी ठरली, क्षेत्ररक्षणाची रचना पाहूनच सांगितली होती ‘ही’ गोष्ट