Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पहिल्या वनडेला बावन्न वर्षे पूर्ण! वाचा ‘त्या’ ऐतिहासिक सामन्याबाबत काही रंजक गोष्टी

Fifty Two Years Completed To First ODI Match Played Between AUS Vs ENG

January 5, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
wankhede-stadium

Photo Courtesy: Twitter/Shayanvk18


‘जानेवारी 5, 1971’… हा दिवस वनडे क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षराने कोरण्यात आला आहे. यामागचे कारणही तसे खास आहे. याच दिवशी वनडे क्रिकेटचा पहिला सामना खेळण्यात आला होता. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर हा ऐतिहासिक सामना झाला होता. या सामन्याला आज (5 जानेवारी) बावन्न वर्षे पूर्ण झाली आहेत.

त्या निमित्ताने जाणून घेऊया, या सामन्याविषयी काही रंजक गोष्टी

पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे शानदार प्रदर्शन
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात मेलबर्न येथे रंगलेला हा ऐतिहासिक वनडे सामना 50 नव्हे तर 40 षटकांचा खेळण्यात आला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघ 190 धावांवर गारद झाला होता. दरम्यान इंग्लंडचे माजी सलामीवीर जॉन एड्रिच यांनी सर्वाधिक 82 धावा केल्या होत्या. त्यांच्याव्यतिरिक्त इतर एकही फलंदाज 30 धावांचा आकडाही गाठू शकला नाही. यात माजी ऑस्ट्रेलियन गोलंदाज ऍशले मॅलेट आणि किथ स्टॅकपोल यांचा मोठा हात होता. मॅलेट यांनी अवघ्या 34 धावा आणि स्टॅकपोल यांनी केवळ 40 धावा देत प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या होत्या.

प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया संघाचे माजी फलंदाज इयान चॅपेल यांनी 5 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 60 धावा केल्या होत्या. तसेच माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डॉग वॉल्टर्स यांनी 41 धावांचे योगदान दिले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाने फक्त 35 षटकात 191 धावा करत 5 विकेट्सने पहिला ऐतिहासिक विजय नोंदवला होता.

46 हजार दर्शकांनी भरले होते स्टेडियम
वनडे क्रिकेटच्या जवळपास 100 वर्षांपुर्वी कसोटी क्रिकेटची सुरुवात झाली होती. त्यामुळे पहिल्या वनडे सामन्यापर्यंत क्रिकेटने लोकांच्या मनात घर केले होते. चार-पाच दिवसांच्या कालावधीत होणाऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यांना पाहायला लोकांची मोठी गर्दी असायची. त्यामुळे मर्यादित षटकांचा क्रिकेट सामना पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक येणे साहजिक होते. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या पहिल्या वनडे सामन्याला तब्बल 46 हजार दर्शकवर्ग लाभला होता.

इंग्लंडचे माजी दिग्गज ठरले पहिले वनडे सामनावीर 
भलेही ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या वनडे सामन्यात बाजी मारली असेल, पण पूर्ण सामन्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूचा ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार इंग्लंड संघाच्या खेळाडूला मिळाला होता. इंग्लंडचे माजी सलामीवीर फलंदाज जॉन एड्रिच, हे ते खेळाडू होते. एड्रिच यांनी 68.91च्या स्ट्राईक रेटने 119 चेंडूत 82 धावांची धडाकेबाज खेळी केली होती. दरम्यान त्यांनी 4  चौकार ठोकले होते. यासह ते पूर्ण सामन्यात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज ठरले होते. त्यांच्या या कामगिरीमुळे पहिल्या वनडे सामन्यातील सामनावीर पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

#OnThisDay in 1971, the @MCG played host to the first ever ODI, as Australia beat England by 5 wickets pic.twitter.com/WqqitjfBOP

— ICC (@ICC) January 5, 2016

पहिल्या वनडे आणि कसोटी सामन्याचा जुळला अनोखा योगायोग
वनडे आणि कसोटी क्रिकेटच्या पहिल्या सामन्याचा एक अनोखा योगायोग जुळून आला होता. 15 मार्च ते 19 मार्च 1877 मध्ये पहिला कसोटी सामना झाला होता; तर 5 जानोवारी 1971 मध्ये पहिला वनडे सामना खेळण्यात आला होता. योगायोगाने हे दोन्ही ऐतिहासिक सामने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघादरम्यान रंगले होते. त्यातही ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर हे सामने झाले होते आणि या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर विजय मिळवला होता.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वाढदिवस विशेष: परदेशात भारतीय संघाला पहिली कसोटी मालिका जिंकून देणारा कर्णधार
अमरावतीचा पठ्ठ्या टीम इंडियात! सॅमसनच्या दुखापतीनंतर मिळाली संधी


Next Post
FC Goa

एफसी गोवा घरच्या मैदानाचा फायदा उचलणार, हैदराबादला टक्कर देणार

Ravi-Shastri

जेव्हा रवी शास्त्रींनी सिडनीत 9 तास फलंदाजी करत साकारली होती द्विशतकी खेळी, पाहा व्हिडिओ

Hardik Pandya & Shivam mavi

पुण्यातही भारत-श्रीलंका यांच्यात पाहायला मिळणार काट्याची टक्कर! मागील सामन्यांचे निकालच धक्कादायक

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143