भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नई येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघातील दोन खेळाडूंमध्ये वाद झाल्याचे दिसून आले. सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हा फिरकीपटू कुलदीप यादव याची मान पकडताना दिसत आहे. हे कृत्य पाहिल्यावर चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावरून चाहते मोहम्मद सिराजला या घटनेबाबत विचारताना दिसत आहेत. अनेक चाहत्यांनी तर बीसीसीआयकडे सिराजवर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.
चेन्नई कसोटीत सहभागी नाहीत दोन्ही खेळाडू
मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव या दोघांचाही चेन्नई कसोटीत खेळत असलेल्या अंतिम अकरा भारतीय खेळाडूंमध्ये सहभाग नाही. कुलदीप व सिराजच्या जागी डावखुरा फिरकीपटू शाहबाज नदीम व अनुभवी वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा यांना संधी देण्यात आली आहे.
अशी घडली घटना
ऑस्ट्रेलिया दौर्यावर भारतासाठी सर्वाधिक १३ बळी मिळवत मोहम्मद सिराजने प्रसिद्धी मिळवली होती. मात्र, आता त्याच्या या कृत्यावर चाहते प्रश्न उपस्थित करत आहेत. चेन्नई कसोटीच्या पहिल्या दिवशी मोहम्मद सिराज हा कुलदीप यादवची मान पकडताना दिसला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सिराज खूप चिडलेला दिसत आहे. सिराज आणि कुलदीप यांच्यादरम्यान मजेत ही घटना घडत असल्याचे अजिबात वाटत नाही. आता हे प्रकरण काय आहे हे पुढे उघड होईल. मात्र, आता प्रश्न असा आहे की, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर संघ व्यवस्थापन काही कारवाई करेल का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
https://twitter.com/VIRATIANstan18/status/1357710446480949248?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1357710446480949248%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fsports%2Fcricket-india-vs-england-mohammed-siraj-grabs-kuldeep-yadav-neck-during-chennai-test-watch-video-3449949.html
यापूर्वी घडले आहेत भारतीय खेळाडूंमध्ये वाद
यापूर्वीही भारतीय संघातील खेळाडूंमध्ये भांडणे झाली आहेत. २०१३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात सुरेश रैना आणि रवींद्र जडेजा यांच्यात वाद झाला होता. सुरेश रैनाने जडेजाची जर्सी खेचलेली. मध्यस्थ खेळाडूंनी दोघांनाही वेगळे केले होते. आता अशाच प्रकारची घटना सिराज आणि कुलदीप यादव यांच्यात पाहायला मिळाली आहे. प्रकरण नक्की काय आहे हे लवकरच समोर येऊ शकते.
महत्वाच्या बातम्या:
दु:खद! पदार्पणाच्या कसोटीत शतक आणि ५ विकेट्स घेणाऱ्या एकमेव क्रिकेटपटूचे निधन
रोहित शर्मा त्रिशतक ठोकेल, मायकेल वॉनच्या त्या ट्विटवर चाहत्याकडून प्रत्युत्तर
भारताच्या संघव्यवस्थापनाची पहिल्या कसोटीसाठी हास्यास्पद संघनिवड, या दिग्गजाची टीका