fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

पीवायसी रिबाऊंड रॅकेट लीग २०२० स्पर्धेत एक्सकॅलिबर्स व कुकरीज यांच्यात अंतिम लढत

पुणे। पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे आयोजित अनोख्या व नाविन्यपूर्ण अशा पीवायसी रिबाऊंड रॅकेट लीग स्पर्धेत उपांत्य फेरीत एक्सकॅलिबर्स व कुकरीज या संघांनी अनुक्रमे सेबर्स व किर्रपन्स या संघांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

पीवायसी हिंदू जिमखानाच्या टेबलटेनिस, टेनिस व बॅडमिंटन कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीत एक्सकॅलिबर्स संघाने सेबर्स संघाचा 12-08 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. टेबल टेनिस प्रकारात शिरीष कर्णिक, संजय बामणे, मधुर इंगळहाळीकर, अभिषेक ताम्हाणे, उदय टेंबे, नितीन कोंकर, संकल्प गोयल, राधिका इंगळहाळीकर, आनंद शहा, आर्य देवधर, गंगाधर कुलकर्णी, चैत्राली नावरे यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर एक्सकॅलिबर्स संघाने सेबर्स संघाचा 6-2 असा पराभव करून आघाडी घेतली. टेनिसमध्ये एक्सकॅलिबर्स संघाला सेबर्स संघाकडून 3-4 असा पराभव स्वीकारावा लागला. पण आघाडीवर असलेल्या एक्सकॅलिबर्स संघाने बॅडमिंटन प्रकारात सेबर्स संघाचा 3-2 असा पराभव करून विजय मिळवला. यात विजयी संघाकडून आकाश सूर्यवंशी, आनंद शहा, समीर जालन, मधुर इंगळहाळीकर, अभिषेक ताम्हाणे, गंगाधर देशपांडे यांनी सुरेख कामगिरी बजावली.

दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात कुकरीज संघाने किर्रपन्स संघाचा 13-07 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. सामन्यात टेबल टेनिसमध्ये अतुल बिनीवाले, किरण गर्गे, सचिन बेलगलकर, तन्मय चितळे, केदार नाडगोंडे, अतुल ठोंबरे, निखिल चितळे, क्षितिज कोतवाल, अमोद प्रधान, गौरव भगत यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर कुकरीज संघाने किर्रपन्स संघाचा 5-3 असा पराभव केला. टेनिसमध्ये कुकरीज संघाने किर्रपन्स 4-3 असा तर, बॅडमिंटनमध्ये कुकरीज संघाने किर्रपन्स 4-1 असा सहज पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी:

एक्सकॅलिबर्स वि.वि.सेबर्स 12-08

टेबल टेनिस: एक्सकॅलिबर्स वि.वि.सेबर्स 6-2(शिरीष कर्णिक/संजय बामणे वि.वि.अतुल्य वाजपेयाम/कौस्तुभ देशपांडे 30-17; मधुर इंगळहाळीकर/अभिषेक ताम्हाणे वि.वि.जयंत महाबोले/विक्रांत पाटील 30-19; उदय टेंबे/नितीन कोंकर वि.वि.सार्थक प्रधान /अभिषेक व्यास 30-13; संकल्प गोयल/राधिका इंगळहाळीकर वि.वि.विनीत रुकारी/ईशान तळवळकर 30-11; आनंद शहा/आर्य देवधर वि.वि.सौरभ चिंचणकर/विक्रम ओगले 30-13; रोहन/अनुज पराभूत वि.प्रियदर्शन डुंबरे/प्रतीक वांगीकर 25-30; मनीषा घैसास/समीर जालन पराभूत वि.रघुनंदन बेहरे/अंकित दामले 29-30; गंगाधर कुलकर्णी/चैत्राली नावरे वि.वि.अवणी गोसावी/रोनीत मुथा 30-19;

टेनिस: एक्सकॅलिबर्स पराभूत वि.सेबर्स 3-4(अभिषेक ताम्हाणे/संतोष शहा वि.वि.प्रतीक वांगीकर/अवणी गोसावी 30-20; रोहन दळवी/नकुल फिरोदिया पराभूत वि.रघुनंदन बेहरे/राजू कांगो 17-30; मधुर इंगळहाळीकर/अनुज साबडे वि.वि.संतोष /हनिफ मेमन 30-26; विलास जावडेकर/विनोद इंगोळे पराभूत वि.अभिषेक व्यास/प्रियदर्शन डुंबरे 21-30; आर्य देवधर/नेहा ताम्हाणे पराभूत वि.ईशान तळवळकर/सौरभ चिंचणकर 09-20; अभय माळी/आजगावकर पराभूत वि.अंकित दामले/रोनीत मुथा 14-20; समीर जालन/आनंद शहा पराभूत वि.विक्रम ओगले/विक्रांत पाटील 20-13);

बॅडमिंटन: एक्सकॅलिबर्स वि.वि.सेबर्स 3-2(आर्य देवधर/राधिका इंगळहाळीकर पराभूत वि.अंकित दामले/विक्रांत पाटील 23-30; चैत्राली नावरे/नितीन कोंकर पराभूत वि.ईशान तळवळकर/विनीत रुकारी 17-30; आकाश सूर्यवंशी/आनंद शहा वि.वि.संजय फेरवानी/विक्रम ओगले 30-10; समीर जालन/मधुर इंगळहाळीकर वि.वि.अनिकेत सहस्रबुद्धे/अनिश रुईकर 30-27; अभिषेक ताम्हाणे/गंगाधर देशपांडे वि.वि.नीरज दांडेकर/रघुनंदन बेहरे 30-19);

कुकरीज वि.वि.किर्रपन्स 13-07

टेबल टेनिस: कुकरीज वि.वि.किर्रपन्स 5-3(अतुल बिनीवाले/किरण गर्गे वि.वि.देवेंद्र चितळे/श्रीदत्त शानबाग 30-23; सचिन बेलगलकर/तन्मय चितळे वि.वि.रणजित पांडे/सुमेध शहा 20-25; केदार नाडगोंडे/अतुल ठोंबरे वि.वि.कुणाल भुरट/नितीन पेंडसे 30-25; तन्मय चोभे/अनिश राणे पराभूत वि.अजय जाधव/संतोष भिडे 18-30; मनीष शहा/राहुल गांगल पराभूत वि.मकरंद चितळे/संग्राम पाटील 14-30; निखिल चितळे/क्षितिज कोतवाल वि.वि.रोहन जमेनिस/अभय जमेनिस 30-18; अमोद प्रधान/गौरव भगत वि.वि.अमित धर्मा/अभिजित मुनोत 30-24; कपिल त्रिमल/अद्विक नाटेकर पराभूत वि.शमीका एरंडे/सुविद नाडकर्णी 21-30);

टेनिस: कुकरीज वि.वि.किर्रपन्स 4-3(गौरव भगत/अभिजित गानू वि.वि.रणजीत पांडे/रोहन जमेनिस 30-23; तनया गोसावी/राहुल गांगल पराभूत वि.अभय जमेनिस/अजय जाधव 19-30; रिया चाफेकर/अद्विक नाटेकर वि.वि.देवेंद्र चितळे/संग्राम पाटील 30-26; केदार नाडगोंडे/तन्मय चोभे वि.वि.सचिन अभ्यंकर/शिरीष साठे 30-15; क्षितिज कोतवाल/मधुरा टेंबे वि.वि.कुणाल भुरट/अभिजित मुनोत 20-18; आदीत पाबळकर/अतुल बिनिवाले पराभूत वि.आकाश भिलारे/नंदन डोंगरे 14-20; प्रांजली नाडगोंडे/अनिश राणे पराभूत वि.समीर जोशी/सुमेध शहा 08-20);

बॅडमिंटन: कुकरीज वि.वि.किर्रपन्स 4-1(अनिश राणे/तेजस चितळे वि.वि.रणजीत पांडे/संग्राम पाटील 30-16; अतुल बिनिवाले/तन्मय चोभे वि.वि.मकरंद चितळे/सुमेध शहा 30-13; अमोद प्रधान/केदार नाडगोंडे वि.वि.देवेंद्र चितळे/श्रीदत्त शानबाग 15-10; अजिंक्य मुठे/मनिष शहा पराभूत वि.सचिन अभ्यंकर/शताक्षी किणीकर 00-30;चिन्मय चिरपुटकर/कपिल बाफना वि.वि.आरुषी पांडे/अन्या तुळपुळे 30-22).

You might also like