fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

आठव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस स्पर्धेत पीवायसी अ व पीवायसी ब यांच्यात अंतिम लढत

पुणे। पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित आठव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत इलाईट डिव्हिजन गटात पीवायसी अ व पीवायसी ब या संघांनी अनुक्रमे एफसी अ व एमडब्लूटीए अ या संघांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत चुरशीच्या झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत पीवायसी ब संघाने एमडब्लूटीए अ संघाचा 20-17 असा संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरी गाठली. 100अधिक गटात पीवायसी ब संघाच्या हिमांशू गोसावी व अनुप मिंडा यांनी एमडब्लूटीए अ संघाच्या सुनील लुल्ला व प्रवीण पांचाळ यांचा 6-2 असा पराभव करून संघाला आघाडी मिळवून दिली. खुल्या गटात पीवायसी ब संघाच्या वरूण मागीकर व अमित लाटे यांना एमडब्लूटीए अ संघाच्या मंदार वाकणकर व आशिष मणियार यांनी टायब्रेकमध्ये (8)5-6 असे पराभूत बरोबरी साधली. त्यानंतर 90 अधिक गटात पीवायसीच्या सुंदर अय्यर व योगेश पंतसचिव यांचा एमडब्लूटीए अ संघाच्या राजेश मंकणी व अमित किंडो यांनी 3-6 असा पराभव करून सामन्यातील आपले आव्हान राखले. निर्णायक खुल्या खुला गटाच्या लढतीत पीवायसी ब संघाच्या अनुप मिंडा व अमोघ बेहेरे या जोडीने एमडब्लूटीए अ संघाच्या सुनील लुल्ला व निलेश ओस्तवाल या जोडीचा 6-3 असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला.

दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत पीवायसी अ संघाने एफसी अ संघाचा 24-05 असा सहज पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. विजयी संघाकडून डॉ.अभय जमेनिस, केदार शहा, प्रशांत सुतार, ऋतू कुलकर्णी, जयंत कढे, अभिषेक ताम्हाणे, केतन धुमाळ यांनी अफलातून कामगिरी केली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी:

पीवायसी अ वि.वि.एफसी अ 24-05(100अधिक गट: डॉ.अभय जमेनिस/केदार शहा वि.वि.संजय रासकर/संग्राम चाफेकर 6-0; खुला गट: केदार शहा/प्रशांत सुतार वि.वि.संग्राम चाफेकर/वैभव अवघडे 6-5(6); 90अधिक गट: ऋतू कुलकर्णी/जयंत कढे वि.वि.पुष्कर पेशवा/पंकज यादव 6-0; खुला गट: अभिषेक ताम्हाणे/केतन धुमाळ वि.वि.सचिन साळुंखे/गणेश देवखिळे 6-0);

पीवायसी ब वि.वि.एमडब्लूटीए अ 20-17(100अधिक गट: हिमांशू गोसावी/अनुप मिंडा वि.वि.सुनील लुल्ला/प्रवीण पांचाळ 6-2;खुला गट: वरूण मागीकर/अमित लाटे पराभूत वि.मंदार वाकणकर/आशिष मणियार (8)5-6; 90 अधिक गट: सुंदर अय्यर/योगेश पंतसचिव पराभूत वि.राजेश मंकणी/अमित किंडो 3-6; खुला गट: अनुप मिंडा/अमोघ बेहेरे वि.वि.सुनील लुल्ला/निलेश ओस्तवाल 6-3).

You might also like