रविवारी 8 जुलैला इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील टी20 मालिका तसेच झिम्बाब्वे, पाकिस्तान आणि आॅस्ट्रेलिया यांच्यातील तिरंगी टी20 मालिका पार पडली.
या दोन मालिकांनंतर सोमवारी आयसीसीने टी20 क्रमवारी जाहिर केली आहे. या क्रमवारीत अनेक बदल झाले आहेत.
फलंदाजीच्या क्रमवारीत भारताचा केएल राहुलने 9 स्थानांची प्रगती करत तिसरे स्थान मिळवले आहे. त्याने इंग्लंड विरुद्ध पहिल्या सामन्यात नाबाद 101 धावांची शतकी खेळी केली होती.
तसेच त्याने 29 जूनला आयर्लंड विरुद्ध दुसऱ्या टी20 सामन्यात 70 धावा केल्या होत्या. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर त्याने क्रमवारीत प्रगती केली आहे.
९०० गुण घेणारा पहिलाच खेळाडू-
त्याचबरोबर या क्रमवारीत आॅस्ट्रेलियाचा टी20 कर्णधार अॅरॉन फिंचने अव्वल स्थान पटकावले आहे. त्याने नुकतेच तिरंगी टी20 मालिकेत झिम्बाब्वे विरुद्ध खेळताना सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्येचा विश्वविक्रम केला होता.
तसेच आता त्याने क्रमवारीतही इतिहास रचला आहे. त्याने फलंदाजी क्रमवारीत अव्वल क्रमांक पटकावताना 900 गुणही मिळवले आहेत. टी20 मध्ये 900 गुण पटकावणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे.
तब्बल ४४ स्थानांची प्रगती-
या फलंदाजी क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानच्या फखर जामन विराजमान झाला आहे. त्याने तब्बल 44 स्थानांची प्रगती केली आहे. मागील काही सामन्यांपासून फखरने चांगल्या कामगिरी सर्वांनी प्रभावित केले आहे. त्याने मागील 5 सामन्यात 3 अर्धशतके नोंदवली आहेत.
राहुल सोडून एकही भारतीय नाही-
मात्र या क्रमवारीत केएल राहुल व्यतिरिक्त भारताचा एकही फलंदाज पहिल्या 10 मध्ये नाही. भारताचा कर्णधार विराट कोहली 12 व्या तर टी20मध्ये 3 शतके करणारा रोहित शर्मा 11 व्या स्थानी आहे.
याचबरोबर गोलंदाजी क्रमवारीत आफगाणिस्तानचा गोलंदाज रशीद खान आणि शदाब खान यांनी आपले अनुक्रमे पहिले आणि दुसरे स्थान कायम ठेवले आहे. तर भारताचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलची 1 स्थानाने घसरण झाली आहे.
तो तिसऱ्या क्रमांकावरुन चौथ्या क्रमांकावर गेला आहे. तसेच भारताच्या अन्य गोलंदाजांपैकी कुलदिप यादवने 41 स्थानांची प्रगती करत 34 वे स्थान पटकावले आहे. तर हार्दिक पंड्या 5 स्थानांची झेप घेत 29 व्या स्थानावर आला आहे.
अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत पहिल्या तीन स्थानात कोणताही बदल झालेला नाही. या क्रमवारीत ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद नबी आणि शाकिब अल हसन अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर कायम आहेत.
याबरोबरच पाकिस्तानने तिरंगी टी20मालिकेचे विजेतेपद मिळवत संघांच्या क्रमवारीतील पहिले स्थान कायम केले आहे. तसेच भारताने आॅस्ट्रेलियाला मागे टाकत दुसरे स्थान मिळवले असून आॅस्ट्रेलियाची तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.
BREAKING: @AaronFinch5 takes over as the No.1 T20I batsman on the @MRFWorldwide rankings after a scintillating tri-series.
And there's a new No.2 and 3 as well ⬇️https://t.co/VNHlc0zhBg pic.twitter.com/9BRFsvXC9l
— ICC (@ICC) July 9, 2018
Australia's @AaronFinch5 is the first player ever to hit 900 points in the @MRFWorldwide ICC T20I Rankings! 🙌
Meanwhile, Pakistan's @FakharZamanLive is up 4️⃣4️⃣ places to second! 💪
➡️ https://t.co/ltPIsgyj6S pic.twitter.com/H8B35g8jHg
— ICC (@ICC) July 9, 2018
महत्त्वाच्या बातम्या:
-क्रिकेटमध्ये एवढं खराब नशीब कोणत्याही खेळाडूचं नसाव!
-एकवेळ चालवत होता पाणीपुरीचा गाडा आता थेट भेटला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरला
-तिसरी टी२० गाजवलेले दोन भारतीय सेहवागकडून ट्रोल