महिला आशिया चषक 2020 मधील 15वा सामना शनिवारी (दि. 8 ऑक्टोबर) सिल्हेट क्रिकेट मैदानावर भारत आणि बांगलादेश संघात खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने अफलातून फलंदाजी केली आहे. त्यांच्या या अफलातून फलंदाजीमुळे भारताने धावफलकावर 159 धावा झळकावल्या आहेत. यामध्ये शेफाली वर्मा हिच्या अर्धशतकांचा समावेश आहे. गुणतालिकेतील स्थान टिकवण्यासाठी हा सामना भारतीय संघासाठी महत्त्वाचा आहे.
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजी करताना भारताने निर्धारित 20 षटकात 5 विकेट्स गमावत 159 धावा चोपल्या. तसेच, बांगलादेश संघाला 160 धावांचे आव्हान दिले आहे. हे आव्हान पार केले, तर भारताच्या पारड्यात स्पर्धेतील सलग दुसरा पराभव पडेल. तसेच, गुणतालिकेतील स्थानातही घसरण होईल.
Innings Break!
A fine batting performance by #TeamIndia to finish at 159/5 👊
Over to our bowlers to defend the score. 👍
Scorecard ➡️ https://t.co/YrBDw2RKTJ#INDvBAN #AsiaCup2022 pic.twitter.com/VdpHRZxKjL
— BCCI Women (@BCCIWomen) October 8, 2022
भारतीय संघाकडून फलंदाजी करताना सलामी फलंदाज शेफाली वर्मा (Shafali Verma) चांगलीच चमकली. तिने धडाकेबाज फलंदाजी करत 44 चेंडूत 55 धावा चोपल्या. या धावा करताना शेफालीने 2 षटकार आणि 5 चौकारही मारले आहेत. शेफालीव्यतिरिक्त स्म्रीती मंधाना हिने 38 चेंडूत 47 धावा केल्या. यावेळी तिने 6 चौकार मारले होते. तसेच, जेमिमाह रोड्रिग्ज हिने 35 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, दिप्ती शर्माला फक्त 10 धावा करता आल्या. रिचा घोष (4), पूजा वस्त्राकार (1) आणि किरण नवगिरे (0) यांना दोन आकडी धावसंख्याही पार करता आली नाही.
5⃣0⃣ for Shafali Verma 👏👏
A superb batting display by the #TeamIndia batter as we move to 108/1 after 14 overs. 👌
Follow the match ➡️ https://t.co/YrBDw2RKTJ#INDvBAN #AsiaCup2022 pic.twitter.com/8ZI6id4Jkq
— BCCI Women (@BCCIWomen) October 8, 2022
यावेळी गोलंदाजी करताना बांगलादेश संंघाकडून रुमाना अहमद हिला सर्वाधिक विकेट्स मिळवण्यात यश आले. रुमानाने 3 षटके गोलंदाजी करताना 27 धावा देत सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या आहेत. तिच्याव्यतिरिक्त सलमा खातून हिनेही 1 विकेट घेत संघासाठी योगदान दिले.
भारतीय संघाचा हा स्पर्धेतील पाचवा सामना आहे. यापूर्वी झालेल्या चार सामन्यांपैकी 3 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे, तर एका सामन्यात पाकिस्तान महिलांविरुद्ध पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. आता या सामन्यात विजय मिळवत भारत गुणतालिकेतील पहिले स्थान टिकवण्याचा प्रयत्न करेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विश्वचषकाच्या तोंडावर वेस्ट इंडिजच्या खेळाडूवर कारवाई, चार वर्षांसाठी झाले निलंबन; वाचा संपूर्ण प्रकरण
बिहारच्या सौरभ कुमारने 49 रुपयांचे केले 1 कोटी, हार्दिक पंड्याला संघात घेतल्यामुळे चमकले नशीब