मुंबई। चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघात गुरुवारी (३१ मार्च) इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामातील सातवा सामना पार पडला. ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला ६ विकेट्सने पराभवाला सामोरे जावे लागले. हा लखनऊचा स्पर्धेतील पहिला विजय होता. मात्र, चेन्नईच्या या पराभवामुळे त्यांच्या नावावर निराशाजनक विक्रमाची नोंद झाली आहे.
आयपीएल २०२२ हंगामातील चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) हा सलग दुसरा पराभव आहे. यापूर्वी चेन्नईने कोलकाताविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यातही पराभव पत्करला होता. त्यामुळे आयपीएलमध्ये हंगामातील पहिले दोन सामने हरण्याची चेन्नईची ही पहिलीच वेळ ठरली आहे. यापूर्वी चेन्नई कधीही हंगामातील पहिले दोन्ही सामने पराभूत झाले नव्हते.
तसेच आयपीएल हंगामातील पहिले दोन सामने पराभूत होणारा रविंद्र जडेजा चेन्नईचा (CSK) पहिलाच कर्णधारही ठरला आहे. आयपीएलच्या १५ व्या हंगामापूर्वी एमएस धोनीने (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सचे कर्णधारपद सोडले होते. त्यामुळे चेन्नईच्या नेतृत्त्वाची धूरा रविंद्र जडेजाकडे सोपवण्यात आली.
जडेजा (Ravindra Jadeja) चेन्नईने नेतृत्व करणारा धोनी आणि रैनानंतरचा तिसराच कर्णधार आहे. पण त्याच्या कर्णधारपदाची सुरुवात फारशी चांगली झालेली नाही. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नईला पहिल्या दोन्ही सामन्यात पराभूत व्हावे लागले (First time CSK have lost their first two matches in an IPL season).
चेन्नईची आयपीएलमधील कामगिरी
चेन्नई आयपीएलच्या १५ हंगामांपैकी १३ वा हंगाम खेळत आहे. चेन्नईवर ९ आणि १० हंगामांसाठी बंदी होती. विशेष म्हणेज चेन्नईने खेळलेल्या १३ पैकी १२ हंगामात एमएस धोनीने नेतृत्व केले आहे. चेन्नईने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत १९७ सामने खेळले आहेत. यातील ११७ सामन्यात चेन्नईने विजय मिळवले आहेत आणि ७८ सामन्यात पराभव पत्करले आहेत. तसेच एक सामना सुपर ओव्हरमध्ये पराभूत झाले असून एका सामन्याचा निकाल लागलेला नाही.
त्याचबरोबर चेन्नईने आत्तापर्यंत ४ वेळा विजेतेपदही जिंकले आहेत. त्यांनी २०१०, २०११, २०१८ आणि २०२१ साली ही विजेतीपदे एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखाली जिंकली आहेत. तसेच आयपीएलमध्ये सर्वाधिक विजेतीपदे जिंकण्याच्या यादीत चेन्नई दुसऱ्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आझम आणि इमामपुढे फिके पडले ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज, धुव्वादार शतके करत विक्रमांचे रचले मनोरे
गंभीरचं धोनीसोबतचं नातं आहे ‘खंबीर’! लखनऊच्या मेंटॉरने चेन्नईच्या माजी कर्णधाराची घेतली भेट, Photo