fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

काय सांगता !! प्रो कबड्डीत पहिल्यांदाच एकाच संघात ५ शतकवीर

प्रो कबड्डीचा ७ हंगाम सुरू आहे. आज २९ ऑगस्ट २०१९ रोजी हंगामातील ६४ वा सामना तामिळ थालायवाज विरुद्ध बंगाल वॉरियर्स यांच्यात पार पडला आहे. या सामन्यात तामिळ थालायवाजला २६-३५ अशा फरकाने पराभव स्विकारावा लागला. हा पराभव स्विकारला असला तरी तमिळ थलायवाजने या सामन्यात एक खास इतिहास रचला आहे.

तमिळ थलायवाजच्या संघात आज १०० किंवा त्यापेक्षा जास्त सामने खेळणारे १-२ नव्हेतर तब्बल ५ खेळाडु खेळत होते. प्रो कबड्डीच्या इतिहासात पहिल्यांदाच असे झाले आहे.

प्रो कबड्डीचा सातवा हंगाम सुरू झाल्यापासून नवीन विक्रम प्रस्थापित होत आहे. सातव्या हंगामात प्रदीप नरवाल ने ९०० रेड गुण पूर्ण करण्याचा विक्रम केला. नवीन कुमार एक्सप्रेस सुसाट आहे. खेळाडूंच्या वयक्तिक कामगिरी व संघाच्या कामगिरी नुसार अनेक विक्रम होत आहेत.

आज प्रो कबड्डीच्या इतिहासात पहिल्यांदाच ५ शतकवीर (किमान १०० सामने खेळणारे) एकाच संघात खेळताना दिसले आहेत. तामिळ थालवाज विरुद्ध बंगाल वॉरियर्स सामना सुरू होताच हा योग जळून आला.

आज अजय ठाकूर, राहुल चौधरी, मोहित छिल्लर, मनजीत छिल्लर, रान सिंग हे प्रो कबड्डीमध्ये १०० किंवा त्यापेक्षा जास्त सामने खेळणारे खेळाडू तमिळ थलायवाजकडून एकत्र खेळले.

खरंतर २१ ऑगस्ट रोजी मोहित छिल्लर प्रो कबड्डीत १०० वा सामना खेळला त्यादिवशी हा इतिहास रचला गेला असता. पण मनजीत चिल्लर जायबंदी असल्याकारणाने तो त्या सामन्यांत खेळत नव्हता. पण आज मनजीत छिल्लर दुखापती नंतर मैदानात उरतला.

त्यामुळे अखेर एकाच सामन्यात किमान १०० सामने खेळणारे ५ खेळाडु एकाच संघाकडून खेळण्याचा इतिहास घडला.

प्रो कबड्डीतच्या इतिहासात सर्वात कमी सामने तामिळ थालवाज (५५ सामने) संघाने खेळले आहेत. तामिळ थालवाज संघाने प्रो कबड्डीत पाचव्या हंगामात खेळायला सुरुवात केली. पण असे असले तरी तामिळ सातव्या हंगामात सर्वात अनुभवी खेळाडू असणारा संघ आहे.

प्रो कबड्डीत किमान १०० सामने खेळाडु -(सातव्या हंगामात थमिळ थालवाज संघात खेळणारे)
अजय ठाकूर- ११३ सामने
राहुल चौधरी- १११ सामने
रण सिंग- ११० सामने
मनजीत छिल्लर- १०२ सामने
मोहित छिल्लर- १०१ सामने

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

स्टिव्ह स्मिथ म्हणला, आर्चरने डोक्याला चेंडू मारला पण मला आऊट केले नाही…

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध धोनीची टीम इंडियात निवड होणे कठीण, पंतलाच मिळणार पसंती..

You might also like