आयपीएलची उत्सुकता थंड होताच आता एका नवीन लीगची घोषणा करण्यात आली आहे. क्रिकेटचा थरार संपताच आता टेबल टेनिस लीग सुरु होणार आहे. मुंबई, दिल्ली, चेन्नई येथे होणाऱ्या या स्पर्धेत भारतीय आणि परदेशी खेळाडूंचा सहभाग असणारआहे.
या पहिल्यावहिल्या लीगमध्ये ६ फ्रँचायजीचा समावेश असणार आहे. क्रिकेट प्रमाणेच टेबल टेनिसला देखील एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यात ही लीग महत्वपूर्ण ठरेल असे वाटत आहे. या लीगची सुरवात १३ जुलै ला होणार आहे व ३० जुलै पर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. प्रत्येक फ्रँचायजीमध्ये भारतीय आणि परदेशी खेळाडू असणार आहेत, ज्यामध्ये ४ महिला ४ पुरुष १ आंतराष्ट्रीय आणि १ भारतीय प्रशिक्षक अश्या सर्वांचा समावेश असणार आहे.
असे असतील संघ आणि त्यांचे मालक:
संघ मालक
१. दबंग स्मॅशर्स राधा कपूर-खन्ना
२. आरपी-एसजी मॅव्हेरिक्स संजीव गोएंका
३. महाराष्ट्र युनाइटेड वाधवा ग्रुप
४. ए. एस. के समीर कोटीचा
५. ऑईलमॅक्स स्टॅग योद्धा कपिल गर्ग आणि विवेक कोहली
उरलेल्या एका संघाची घोषणा काही दिवसात करण्यात येणार आहे.