Thursday, February 2, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

IPL 2023 Auction | प्रतिभा असुनही ‘या’ पाच दिग्गजांवर संघांनी दाखवला अविश्वास, पाहा यादी

IPL 2023 Auction | प्रतिभा असुनही 'या' पाच दिग्गजांवर संघांनी दाखवला अविश्वास, पाहा यादी

December 23, 2022
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
Shakib Al Hasan

Photo Courtesy: Twitter/ICC


आयपीएल 2023 हंगामासाठी बीसीसीआयने शुक्रवारी खेळाडूंचा लिलाव आयोजित केला होता. या लिलिवाता काही खेळाडूंवर पैशाचा जोरदार पाऊस पडला, तर काही खेळाडूंना खरेदी करण्यासाठी एकही संघ पुढे आला नाही. लिलिवाच्या पहिल्या फेरीत असे काही दिग्गज खेळाडू देखील होते, ज्यांना खरेदीदार मिळाले नाहीत. आपण या लेखात अशाच पाच खेळाडूंविषयी जाणून घेऊ, ज्यांना मोठी रक्कम मिळणे अपेक्षीत होते, पण प्रत्यक्षाक असे काहीच झाले नाही.

आयपीएल 2023 पूर्वी झालेल्या या लिलिवात इंग्लंडचे खेळाडू सर्वात महागात विकले गेले. सॅम करन (Sam Curran) याला पंजाब किंग्जने विक्रम 18.50 कोटी रुपये बोली लावून संघात सहभागी करून घेतले. तर त्यांचा अष्टपैलू बेन स्टोक्स 16.25 कोटी रुपयांमध्ये चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामील झाला. इंग्लंडचा हॅरी ब्रूक देखील तब्बल 13.25 कोटी रुपयांना विकला गेला. सनरायझर्स हैदराबादने त्याला ताफ्यात सहभागी केले. इंग्लंडच्या कसोटी संघाचा माजी कर्णधार जो रुट देखील यावेळी आयपीएल खेळण्यासाठी इच्छुक होता आणि त्याने लिलावात स्वतःचे नाव दिले होते. मात्र रुटला लिलावात एकही संघाने खरेदी करण्याची इच्छा दाखवली नाही.

जो रुट (Joe Root) प्रमाणेच, बांगलादेश संघाचा कर्णधार शाकिब अल हसन (Shakib Al Hasan), मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये बांगलादेशचे नेतृत्व करणारा लिटन दास (Litton Das), ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज ऍडम झंपा (Adam Zampa) आणि श्रीलंकन दिग्गज कुसल मेंडिस (kusal mendis) यांनाही खरेदीदार मिळाले नाहीत. या सर्वांना आयपीएल लिलावात मोठी रक्कम मिळण्याची शक्यता होती. मात्र, प्रत्यक्षात तसे काहीच झाले नाही.

जो रुट –
जो रुट मागच्या मोठ्या काळापासून इंग्लंडच्या कसोटी संघाचे नेतृत्व करत होता. मात्र यावर्षी एप्रिल महिन्यात संघाच्या खराब प्रदर्शनामुळे कर्णधारपद सोडले. असे असले तरी, त्याचे वैयक्तिक प्रदर्शन मात्र, कधीच खालावल्यासारखे वाटले नाही. रुटने अजून आयपीएलमध्ये एकही सामना खेळला नाहीये, पण ऑस्ट्रेलियासाठी त्याने 32 टी-20 सामन्यांमध्ये 35.72 च्या सरासरीने 893 धावा केल्या आहेत. अशात आयपीएलमध्ये देखील तो चांगले प्रदर्शन करू शकत होता. रुटची कसोटी कारकीर्द जबरदस्त राहिली आहे. ऑस्ट्रेलियासाठी त्याने 127 कसोटी सामन्यांमध्ये 49.44 च्या सरासरीने 10629 धावा केल्या आहेत. वनडे फॉरमॅटमध्ये रुटने 158 सामन्यांमध्ये 6207 धावा केल्या आहेत. आयपीएल लिलावासाठी रुटची बेस प्राईस 1 कोटी रुपये होती.

England's Joe Root is NEXT with a base price of INR 1 Crore

He goes UNSOLD #TATAIPLAuction | @TataCompanies

— IndianPremierLeague (@IPL) December 23, 2022

शाकिब अल हसन –
बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन देखील आयपीएल 2023 साठी महागात विकला जाईल, असे सांगितले जात होते. शाकिबला आंतरराष्ट्रीय आणि आयपीएलमध्ये खेळण्याचा मोठा अनुभव आहे. अशात कोणत्याही फ्रँचायझीसाठी त्याचा हा अनुभव कामी येऊ शकतो. मात्र, लिलावात कोणत्याच फ्रँचायझीने त्याला खरेदी करण्याची इच्छा दाखवली नाही. परिणामी शाकिब देखील अनसोडल्ड राहिला. त्याची बेस प्राईज 1.50 कोटी रुपेय होती. शाकीबने आयपीएलमध्ये आतापर्यंत 71 सामने खेळले असून यामध्ये 1484 धावा केल्या. तर गोलंदाजी करकताना 63 विकेट्स देखील घेतल्या आहेत.

Shakib Al Hasan with a base price of INR 1.5 Crore is UNSOLD#TATAIPLAuction | @TataCompanies

— IndianPremierLeague (@IPL) December 23, 2022

लिटन दास –
लिटन दास नुकताच भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या वनेड मालिकेत बांगालदेचे नेतृत्व करताना दिसला. त्याच्या नेतृत्वात बांगलादेशने ही मालिका जिंकली देखील. मात्र, या कामगिरीनंतर देखील त्याला आयपीएल लिलावात खरेदीदार मात्र मिळाला नाहीये. लिटन दासची बेस प्राईज 50 लाख रुपये होती. पण तरीदेखील त्याला खरेदी करण्यासाठी कोणत्याच संघाने पुढाकार घेतला नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने 37 कसोटी, 60 वनडे आणि 65 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आयपीएलमध्ये त्याने नावापुढे एकही सामना खेळल्याचे दिसत नाही. असे असले तरी, यापूर्वी तो राजस्थान रॉयल्स संघाचा भाग राहिला आहे.

We are back after a short break and the first player to go under the hammer is Litton Das with a base price of INR 50 Lakh

He goes UNSOLD #TATAIPLAuction | @TataCompanies

— IndianPremierLeague (@IPL) December 23, 2022

ऍडम झंपा –
ऑस्ट्रेलियासाठी वनडे आणि टी-20 फॉरमॅटमध्ये फिरकी गोलंदाज ऍडम झंपा आयपीएल 2023 मध्ये महत्वाची भूमिका पार पाडू शकत होता. मात्र, लिलावात पहिल्या फेरीत त्याला खरेदीदार मिळाला नाही. झंपाने यापूर्वी आयपीएलमध्ये रायजिंग पुणे सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी 14 सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने 21 विकेस्ट घेतल्या असून फलंदाजीत 287 धावांच योगदान देखील दिले.

Australia's Adam Zampa is UNSOLD #TATAIPLAuction | @TataCompanies

— IndianPremierLeague (@IPL) December 23, 2022

कुसल मेंडिस –
श्रीलंकेचा दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज कुसल मेंडिस यालाही आगामी आयपीएल हंगामासाठी खरेदीदार मिळाला नाहीये. पहिल्या फेरीत त्याला खरेदी करण्यासाठी एकही संघ इच्छुक नव्हता आणि परिणामी हा खेळाडू अनसोल्ड राहिला. मेंडिसने आयपीएलमध्ये अजून एकही सामना खेळला नाहीये. मात्र स्वतःच्या देशासाठी मात्र त्याची कामगिरी चमकदार म्हणावी लागेल. त्याने श्रीलंकेसाठी 54 कसोटी, 90 वनडे आणि 49 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. अशात आयपीएलच्या आगामी हंगामात देकील हा फलंदाज महत्वापूर्ण भूमिका पार पाडू शकत होता. दुसऱ्या फेरीत या अनसोल्ड खेळाडूंपैकी कोणते खेळाडू विकले जातात आणि कोणाला अखेरपर्यंत खरेदीदार मिळत नाही, हे पाहण्यासारखे असेल.

Kusal Mendis is next and goes UNSOLD #TATAIPLAuction | @TataCompanies

— IndianPremierLeague (@IPL) December 23, 2022

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल 2023च्या मिनी लिलावात ‘हे’ चार खेळाडू मालामाल, मिळाली 15 कोटींहून अधिक रक्कम
मूर्ती लहान कीर्ती महान! सॅम करन बनला आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू, पहिल्या पाचात एकच भारतीय


Next Post
Manish-Pandey

आयपीएल 2023च्या लिलावात मनीष पांडेवर दिल्लीने केली पैशांची उधळण, बेस प्राईजपेक्षा दुप्पट रक्कम खिशात

Narayan Jagadeesan

मि. कंसिस्टंट 'जगदीसन' केकेआरकडे! इतक्या रकमेत बनला नाईट रायडर

Adil Rashid

इंग्लंडला विश्वचषक जिंकून देणारा 'हा' खेळाडू सनरायझर्स हैदराबादच्या गोटात सामील

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143