Loading...

पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत फ्लाईंग हॉक्स संघाची रायजिंग ईगल्स संघावर मात

पुणे। पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत साखळी फेरीत फ्लाईंग हॉक्स संघाने इंटेन्सिटी टेनिस अकादमी रायजिंग ईगल्स संघाचा 47-33 असा पराभव करून शानदार सुरुवात केली.

डेक्कन जिमखाना व पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीच्या सामन्यात इंटेन्सिटी टेनिस अकादमी रायजिंग ईगल्स संघाला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. फ्लाईंग हॉक्स संघाने इंटेन्सिटी टेनिस अकादमी रायजिंग ईगल्स संघाचा 47-33 असा पराभव केला.

फ्लाईंग हॉक्स संघाकडून अंशुल पुजारी, सक्षम भन्साळी, अर्जुन कीर्तने, श्रावणी देशमुख, कौशिकी समंथा, तेज ओक, तनिश बेलगलकर,पार्थ देवरुखकर, श्लोक गांधी यांनी संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पराभूत संघाकडून आरोही देशमुख, आर्यन हूड, शिवतेज श्रीफुले, वरद उंडरे, सहाना कमलाकन्नन, पृथ्वीराज हिरेमठ यांनी विजय मिळवला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:

फ्लाईंग हॉक्स वि.वि.इंटेन्सिटी टेनिस अकादमी रायजिंग ईगल्स 47-33

एकेरी:
8वर्षाखालील मिश्र गट: अंशुल पुजारी वि.वि रित्सा कोंडकर 4-2;
10वर्षाखालील मुले: सक्षम भन्साळी वि.वि.अहान सारस्वत 4-3(2);
10 वर्षाखालील मुली: जसलीन कटारिया पराभूत वि.आरोही देशमुख 1-4;
12 वर्षाखालील मुले: अर्जुन कीर्तने वि.वि.पार्थ काळे 6-0;
12वर्षाखालील मुली: श्रावणी देशमुख वि.वि.देवांशी प्रभुदेसाई 6-1;
14वर्षाखालील मुले: सुधांशु सावंत पराभूत वि.आर्यन हूड 4-6;
14वर्षाखालील मुली:कौशिकी समंथा वि.वि.सिद्धी खोत 6-3;

कुमार दुहेरी मुले: तेज ओक/तनिश बेलगलकर वि.वि.अनिश रांजलकर/आर्यन खलाटे 6-2;
14वर्षाखालील मुले दुहेरी: पार्थ देवरुखकर/श्लोक गांधी वि.वि. अनन्मय उपाध्याय/दिव्यांक कवितके 6-2;
10 वर्षाखालील मुले दुहेरी: देव घुवालेवाला/निव गोजिया पराभूत वि.शिवतेज श्रीफुले/वरद उंडरे 2-4;
मिश्र दुहेरी:चिराग चौधरी/एंजल भाटिया पराभूत वि.सहाना कमलाकन्नन/पृथ्वीराज हिरेमठ 2-6).

Loading...
You might also like
Loading...