सध्या जगभरता इंडियन प्रीयमर लीग म्हणजेच आयपीएलची चर्चा सुरू आहे. अनेकांच्या मते आयपीएलमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे महत्व कमी होत आहे. आगामी काळात यूएईत इंटरनॅशनल लीग टी-२० सुरू होणार आहे, ज्यामध्ये आयपीएल फ्रँचायझींनी गुंतवणूक केली आहे. आयपीएल फ्रँचायझींनी या लीगमध्ये संघ खरेदी केल्यामुळे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियन दिग्गज मात्र प्रश्न उपस्थित करत आहेत. अशातच भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांची याविषयी मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे.
आयपीएल फ्रँचायझींच्या काही मालकांनी दुबईतील इंटनॅशनल लीग टी-२० मध्ये संघ खरेदी केल्यानंतर या सर्व चर्चांना उधाण आले आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांना चिंता वाटत आहे की, टी-२० लीग क्रिकेटमुळे खेळाडू राष्ट्रीय संघाला प्राधान्य देणार नाहीत. याचे सर्वाधिक नुकसाना ऑस्ट्रेलियाला होऊ शकते, कारण बीबीएल आणि इंटरनॅशनल लीग टी-२० स्पर्धेचे आयोजन एका वेळी केले जाणार आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी मत व्यक्त केले आहे. त्यांच्या मते इतर देशांना या प्रकरणात पडू नये. कारण भारत त्याचे हित लक्षात हेऊन निर्णय घेत आहे. या देशांनीही त्यांच्या स्वतःच्या क्रिकेटकडे लक्ष दिले पाहिजे. गावसकर म्हणाले की, “तुम्ही तुच्या क्रिकेटचे हित पाहा आणि आम्ही काय करत आहोत त्यात हस्तक्षेप करू नका. आम्ही आमच्या फायद्यासाठी निर्णय घेणार की, तुम्ही जे म्हणालं तसेच करायचे?”
सुनील गावसकराच्या मते इंटरनॅशनल लीग टी-२० आणि दक्षिण आफ्रिकेच्या नवीन टी-२० लीगची घोषणा होताच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाने निशाणा साधायला सुरुवात केली आहे. ते म्हणाला की, “पुन्हा एकदा या चर्चा होत आहेत की, आयपीएलमुळे इतर संघांच्या क्रिकेट कॅलेंडरवर (वार्षीय वेळापत्रक) परिणाम होत आहे. जेव्हापासून दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० लीग आणि यूएईच्या टी-२० लीगची बातमी समोर आली आहे, क्रिकेटचे जुने पावरहाऊस (इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया) गोंधळ घालू लागले आहेत.”
दरम्यान, काही दिवसांपूर्वी आलेल्या वृत्तांनुसार आयपीएलमधील मुंबई इडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या तीन फ्रँचायझींनी यूएईतील टी-२० लीगमध्ये संघ खरेदी केले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तानी पैलवानाला आसमान दाखवणाऱ्या दीपक पुनियासाठी पंतप्रधानांचे खास ट्वीट
VIDEO: पाच महिन्यांपासून टीम इंडिया बाहेर असलेला ऑलराऊंडर कमबॅकसाठी सज्ज