कोणाला कधी नशिबाची साथ मिळेल आणि त्याला यश मिळेल, हे सांगता येत नाही. आगामी वनडे विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर असेच काहीसे लोकेश कुमार याच्यासोबत झाले. लोकेश मागच्या चार वर्षांपासून फूड डिलिवरीचे काम करत होता. पण बुधवारी (20 सप्टेंबर) नेदर्लंड संघात नेट गोलंदाज म्हणून स्थान मिळवले.
आगामी वनडे विश्वचषक भारतात 5 ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे. विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर इतर संघांप्रमाणे नेदर्लंड देखील भारतात दाखल झाला आहे. त्यांना विश्वचषकापूर्वी सरावासाठी नेट गोलंदाजांची आवश्यकता होती. याच कारणास्तव नेदर्लंड क्रिकेट बोर्डाच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून यासाठी जाहिरात शेअर केली गेली होती. लोकेशने हीच जाहिरात पाहून या जागेसाठी अर्ज केला होता. आपल्या गुणवत्तेच्या जोरावर फिरकीपटूला नेदर्लंडसाठी विश्वचषक खेळणाऱ्या फलंदांना गोलंदाजी करता येणार आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार लोकेश कुमार याने एका मोबाईल एप्लिकेशनवर आपला गोलंदाजीचा व्हिडिओ शेअर करून या जागेसाठी अर्ज केला होता. संघ व्यवस्थापनाने तब्बल 10000 गोलंदाजांमधून लोकेससह एकूण चौघांना नेट गोलंदाज म्हणून निवडले आहे. मंगळवारी (18 सप्टेंबर) त्याची निवड झाली असून बुधवारी तो नेदर्लंडच्या ताफ्यात सामील देखील झाला.
Our first training session in India for the #CWC23 began with a small induction ceremony for our four new net bowlers from different parts of India. ???? pic.twitter.com/ug0gHb73tn
— Cricket????Netherlands (@KNCBcricket) September 20, 2023
“हा माच्या कारकिर्दीतील सर्वात मोल्यवान क्षणांपैकी एक आहे. मी अद्याप तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनसाठी थर्ड डिविजन देखील खेळलो नाहीये. नेदर्लंड क्रिकेट संघातील सदस्यांनी मोकळ्या मनाने माझे स्वागत केले. फूड जिलिवरी एग्जिक्यूटीवर म्हणून काम करताना एक क्रिकेटपटू म्हणून मी स्वतःला विकसीत करत होतो. कॉलेजच्या दिवसांपासून माझे लक्ष्य क्रिकेटवर केंद्रित होते. मी यासाठी चार वर्ष दिले. पण नंतर 2018 मध्ये नोकरी करण्याचा निर्णय घेतला. मागच्या चार वर्षांपासून मी स्विंगीसोबत आहे. मला फूड डिलिवरी करून पैसे मिळतात, इतर कोणताही कमाईचा मार्ग माझ्याकडे नाहीये”
दरम्यान, आघामी वनडे विश्वचषकातील पहिला सामना 5 ऑक्टोबर रोजी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात अहमदाबादमध्ये होईल. नेदर्लंड संघ आपला पहिला सामना पाकिस्तानसोबत 6 ऑक्टोबर रोजी खेळेल. यजमान भारताला आपला पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियासोबत खेळायचा आहे. (Food delivery boy selected as Ireland’s net bowler)
महत्वाच्या बातम्या –
सूर्यकुमारला मिळाले अल्टिमेटम? ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका सुरू होण्यापूर्वी कोचचे मोठे विधान
काऊंटीत करून नायरचा धमाका, अवघ्या दुसऱ्याच सामन्यात ठोकलं दीडशतक