---Advertisement---

नेमारची गर्लफ्रेंड आजमावणार बॉलीवूडमध्ये नशीब! गिरवतेय हिंदी आणि कथ्थकचे धडे

On: शुक्रवार, फेब्रुवारी 24, 2023 6:30 PM
---Advertisement---

ब्राझीलचा प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमार याची एक्स गर्लफ्रेंड नतालिया बारूलिक सध्या भारत दौऱ्यावर आहे. ती आता भारतात राहून बॉलिवूडमध्ये नशीब आजमावणार असल्याचे सांगितले जाते. त्यासाठी नतालिया हिंदी भाषा शिकत असून, तिने कथ्थक नृत्याचे शास्त्रीय शिक्षण घेण्यासही सुरुवात केली आहे.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, नतालियाने बॉलीवूडमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केलीये. यासाठी ती मेहनत घेत असून, हिंदी भाषा तसेच शास्त्रीय नृत्य देखील ती शिकतेय‌. नतालिया म्हणाली,

“मला आधीपासूनच भारत आवडतो. येथील संस्कृती आणि लोक आवडतात. मला भारतात काम करायला नक्की आवडेल. देवाची इच्छा असेल तर मला नक्की काही प्रोजेक्ट मिळतील. मी सध्या कथ्थक शिकतेय. हे खूपच अवघड वाटते. कारण यामध्ये पाय वेगाने हलवावे लागतात. मात्र, मेहनत करून मला या ठिकाणी माझी जागा बनवायची आहे.”

नतालियाने आपल्या आवडत्या बॉलीवूड अभिनेता व अभिनेत्री यांचे विषयी देखील सांगितले. ती म्हणाली, “मला कॅटरिना कैफ खूप आवडते. मी तिला आयडल मानते. अभिनेत्यांमध्ये सलमान खान माझ्या आवडीचा आहे. मला हॉलीवुडपेक्षा बॉलीवूड अधिक जवळचे वाटते.”

आपल्याला नेमारची एक्स गर्लफ्रेंड ही ओळख पुसून स्वतःची नवी ओळख निर्माण करायची असल्याचे देखील तिने सांगितले. नतालिया 31 वर्षांची असून ती अमेरिकेची नागरिक आहे. यासोबतच ती गायक म्हणून देखील ओळखली जाते. 2020 मध्ये ती नेमार याला डेट करत असल्याची बातमी समोर आलेली. मात्र, त्यांचे हे नाते फार काळ टिकू शकले नव्हते.

(Footballer Neymar Ex Girlfriend Natalia Barulich Showing Intrest In Working In Bollywood)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘शाळेतील पोरीची चूक’, म्हणणाऱ्या इंग्लंडच्या दिग्गजाला हरमनप्रीतचे सडेतोड प्रत्युत्तर; काय म्हणाली वाचाच
कारकिर्दीतील 9व्या इनिंगमध्ये हॅरी ब्रुकचा विश्वविक्रम, भारतीय दिग्गजाचा मागे टाकत केल्या सर्वाधिक धावा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---