Thursday, March 23, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नेमारची गर्लफ्रेंड आजमावणार बॉलीवूडमध्ये नशीब! गिरवतेय हिंदी आणि कथ्थकचे धडे

February 24, 2023
in टॉप बातम्या, फुटबॉल
Photo Courtesy: Instgram/Natalia Barulich/NeymarJr

Photo Courtesy: Instgram/Natalia Barulich/NeymarJr


ब्राझीलचा प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमार याची एक्स गर्लफ्रेंड नतालिया बारूलिक सध्या भारत दौऱ्यावर आहे. ती आता भारतात राहून बॉलिवूडमध्ये नशीब आजमावणार असल्याचे सांगितले जाते. त्यासाठी नतालिया हिंदी भाषा शिकत असून, तिने कथ्थक नृत्याचे शास्त्रीय शिक्षण घेण्यासही सुरुवात केली आहे.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, नतालियाने बॉलीवूडमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केलीये. यासाठी ती मेहनत घेत असून, हिंदी भाषा तसेच शास्त्रीय नृत्य देखील ती शिकतेय‌. नतालिया म्हणाली,

“मला आधीपासूनच भारत आवडतो. येथील संस्कृती आणि लोक आवडतात. मला भारतात काम करायला नक्की आवडेल. देवाची इच्छा असेल तर मला नक्की काही प्रोजेक्ट मिळतील. मी सध्या कथ्थक शिकतेय. हे खूपच अवघड वाटते. कारण यामध्ये पाय वेगाने हलवावे लागतात. मात्र, मेहनत करून मला या ठिकाणी माझी जागा बनवायची आहे.”

नतालियाने आपल्या आवडत्या बॉलीवूड अभिनेता व अभिनेत्री यांचे विषयी देखील सांगितले. ती म्हणाली, “मला कॅटरिना कैफ खूप आवडते. मी तिला आयडल मानते. अभिनेत्यांमध्ये सलमान खान माझ्या आवडीचा आहे. मला हॉलीवुडपेक्षा बॉलीवूड अधिक जवळचे वाटते.”

आपल्याला नेमारची एक्स गर्लफ्रेंड ही ओळख पुसून स्वतःची नवी ओळख निर्माण करायची असल्याचे देखील तिने सांगितले. नतालिया 31 वर्षांची असून ती अमेरिकेची नागरिक आहे. यासोबतच ती गायक म्हणून देखील ओळखली जाते. 2020 मध्ये ती नेमार याला डेट करत असल्याची बातमी समोर आलेली. मात्र, त्यांचे हे नाते फार काळ टिकू शकले नव्हते.

(Footballer Neymar Ex Girlfriend Natalia Barulich Showing Intrest In Working In Bollywood)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘शाळेतील पोरीची चूक’, म्हणणाऱ्या इंग्लंडच्या दिग्गजाला हरमनप्रीतचे सडेतोड प्रत्युत्तर; काय म्हणाली वाचाच
कारकिर्दीतील 9व्या इनिंगमध्ये हॅरी ब्रुकचा विश्वविक्रम, भारतीय दिग्गजाचा मागे टाकत केल्या सर्वाधिक धावा


Next Post
Mumbai-Indians

धक्कादायक! आयपीएलमध्ये खेळवण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांना गंडा, युवा खेळाडूची तक्रार

National Sailing

राष्ट्रीय नौकानयन । सेनादलाच्या वर्चस्वावर शिक्कामोर्तब, सतनामचे लक्षणीय यश, महिलांमध्ये ओडिशा अव्वल, महाराष्ट्राच्या मृण्मयीला सुवर्ण

Photo Courtesy: iplt20.com

"धोनीने आमच्या लीगमध्ये खेळावे", आयपीएलमध्ये नेतृत्व करणाऱ्या विदेशी कर्णधाराची ऑफर

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143