तीन वेळच्या विश्वचषक विजेत्या क्रिकेट संघाचा खेळाडू आणि ऑस्ट्रेलियाच्या महान खेळाडूंपैकी एक ग्लेन मॅकग्रा याच्याशी संबंधित अंगावर काटा आणणारी बातमी समोर येत आहे. ग्लेन मॅकग्रा याच्या एका व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. या व्हिडिओत तो अजगर पकडताना दिसत आहे. ग्लेन मॅकग्राने व्हिडिओ त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून टाकला आहे, जो सर्वत्र व्हायरल होत आहे.
ग्लेन मॅकग्रा (Glenn McGrath) याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो आपल्या घरात घुसलेल्या अजगरांना पकडताना दिसत आहे. व्हिडिओत दिसते की, ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज पोछा मारणाऱ्या काटीने सापाला पकडण्याचा प्रयत्न करत आहे.
मॅकग्रा याने सांगितले, की त्याने आपल्या घरातून कोस्टल कार्पेट पायथन प्रजातीच्या 3 अजगरांना पकडले. मात्र, व्हिडिओत तो एकाच सापाला पकडताना दिसला. इतर दोन अजगरांचे फोटो त्याने इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. तसेच, एक अजगर त्याच्या किचनपर्यंत पोहोचला होता. ही स्टोरी शेअर करत त्याने आपल्या पत्नीसोबतही चेष्टा केली.
मॅकग्राने व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, “सारा लिओन मॅकग्राच्या प्रोत्साहन आणि समर्थनानंतर घरात असलेल्या 3 कोस्टल कार्पेट अजगरांना सुरक्षितरीत्या पुन्हा झुडपात सोडण्यात आले.”
https://www.instagram.com/reel/Cw3aLO5yCV1/?utm_source=ig_embed&ig_rid=1afbc9c6-a4ca-4406-a1bd-d9654bff96e3
मॅकग्रा याच्याविषयी बोलायचं झालं, तर तो न्यू साऊथ वेल्सचा रहिवासी आहे. या भागात अशाप्रकारे साप सापडणे सामान्य बाब आहे. त्यामुळेच मॅकग्राला साप पकडण्याचा चांगला अनुभव आहे. त्याच्या या व्हिडिओवर नेटकरीही मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. एकाने कमेंट करत लिहिले, “स्वत:च्या आणि सापाच्या मध्ये चांगली लाईन-लेंथ ठेव. शानदार काम.”
मॅकग्राची कारकीर्द
ग्लेन मॅकग्रा याच्याविषयी बोलायचं झालं, तर 53 वर्षीय खेळाडूची गणना जगातील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये होते. त्याने 14 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत अनुक्रमे 124 कसोटी सामने, 250 वनडे सामने आणि 2 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये कसोटीत त्याने 563 विकेट्स, वनडेत 381 विकेट्स आणि टी20त 5 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने एकूण आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत 949 विकेट्स घेतल्या आहेत. निवृत्तीनंतर तो समालोचनाद्वारे चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसतो. (former aussie pacer glenn mcgrath caught and relocated three coastal carpet python snakes)
हेही वाचाच-
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी वाढली भारताची ताकद, टीम इंडियात स्टार खेळाडूचे कमबॅक
वर्ल्डकपसाठी अंपायर्सची यादी आली रे! यादीत 20 पैकी फक्त एकच भारतीय पंच