टी२० क्रिकेटच्या जमान्यात फलंदाज अधिकाधिक धावा काढण्याचा प्रयत्न करत असतात. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या फटक्यांचा शोध लावलेला आपण पाहतो. सध्या अशा पारंपारिक फटक्यांव्यतिरिक्त खेळल्या जाणाऱ्या आधुनिक फटक्यांची चलती आहे. त्यापैकी, ‘स्विच हिट’ हा फटका सर्रास खेळला जातो. आता त्याच स्विच हिटवर बंदी आणण्याची संतप्त मागणी ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे केली आहे. सध्या सुरू असलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेदरम्यान त्यांनी ही मागणी केली.
…तर कर्णधार काहीही करू शकत नाही
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडूंमध्ये सामील असलेले चॅपेल वाईड वर्ल्ड स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाले, “वॉर्नर व मॅक्सवेलने दुसऱ्या वनडे सामन्यात अनेकदा स्विच हिटचे फटके मारले. मला वाटते, फटका खेळण्यापूर्वी फलंदाजाने पाय किंवा हात बदलला, तर तो फटका बेकायदेशीर ठरवावा. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा कर्णधार फलंदाजाच्या शैलीनुसार क्षेत्ररक्षण लावत असतो. मात्र, फलंदाजाने असा विचित्र फटका खेळला, तर कर्णधार काहीही करू शकत नाही.”
चॅपेल यांनी घेतली गोलंदाजांची बाजू
चॅपेल यांनी पुढे गोलंदाजांची बाजू घेताना म्हटले, “गोलंदाजाला चेंडू टाकण्यापूर्वी पंचांना तो कोणत्या बाजूने गोलंदाजी करणार आहे, हे सांगावे लागते. मला अनेकदा प्रश्न पडतो की, गोलंदाज अशा फटक्यांविषयी का काही बोलत नाहीत? कमीतकमी चाहत्यांनी तरी हे थांबवायला सांगितले पाहिजे.”
ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी खेळले होते स्विच हिटचे फटके
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान सुरू असलेल्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिल्या दोन्ही सामन्यात भारताचा पराभव केला. दोन्ही सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ३७० पेक्षा अधिक धावा उभारल्या. सलामीवीर डेविड वॉर्नर व अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल यांनी अनेकदा स्विच हिट मारत चौकार-षटकार वसूल केले. मालिकेतील अखेरचा सामना बुधवारी (२ डिसेंबर) कॅनबेरा येथे खेळवला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
‘विराट फलंदाजीला आल्यावर मला झोपेतून उठवा’, आपल्या मुलाबद्दल इंग्लंडच्या माजी कर्णधाराचे वक्तव्य
शाहरुख खानने विकत घेतला आणखी एक टी२० संघ, ‘या’ लीगमध्ये घेणार भाग
ट्रेंडिंग लेख-
लाजवाब! ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० मालिकेत खोर्याने धावा काढणारे ३ भारतीय खेळाडू
नादच खुळा! ऑस्ट्रेलिया दौर्यात एकाच टी२० मालिकेत सर्वात जास्त विकेट्स घेणारे ३ भारतीय शिलेदार
गोष्ट एका क्रिकेटरची भाग १०: भारताचा भन्नाट क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ