भारतीय संघाचा माजी दिग्गज कर्णधार एमएस धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन आता 2 वर्षे उलटले आहेत. त्याने भारतीय संघाला आयसीसीच्या तीन ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत. धोनी सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसत नसला, तरीही तो चाहत्यांमध्ये भलताच चर्चेत असतो. चाहत्यांमधील त्याची क्रेझ किंचीतही कमी झाली नाहीये. धोनी नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतो. अनेकजण त्याला आपला आदर्श मानतात. अशात त्याला एक नवीन महिला चाहती भेटली आहे. त्या महिला चाहतीने नुकतेच तिचे हार्ट ट्रान्सप्लान्ट सर्जरीनंतर त्याचे स्केच बनवत सर्वांना चकित केले आहे.
धोनीच्या महिला चाहतीची सर्जरी
महिला चाहतीची चेन्नईमध्ये ट्रान्सप्लान्ट सर्जरी झाली आहे. यशस्वीरीत्या पार पडलेल्या या सर्जरीनंतर चाहतीने एमएस धोनी याचे शानदार स्केच (MS Dhoni Sketch) बनवले आहे. तसेच, यामार्फत सर्वांना विचार करण्यास भाग पाडले आहे. महिला चाहतीने हे स्केच आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.
This has our whole hearts! ????
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) October 20, 2022
धोनीची प्रतिक्रिया
एमएस धोनी (MS Dhoni) यानेही या स्केचवर प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, “अवयव दान हे खूपच योग्य कार्य आहे. हे कोणत्याही व्यक्तीचे आयुष्य वाचवू शकते. कुणालाही गमावणे खूपच दु:खद असते. अंग दान केल्याने इतरांना दुसरे आयुष्य लाभू शकते. मी अवयव दान करणाऱ्या कुटुंबाला या उदात्त कार्यासाठी आभार व्यक्त करतो.”
पुढे बोलताना तो म्हणाला की, “कावेरी रुग्णालयाचे हृदय आणि फुफ्फुस ट्रान्सप्लान्ट युनिट लाँच केल्यामुळे मला सन्मान वाटतो. अनेक लोकांचा जीव वाचवण्यासाठी मी डॉक्टरांचेही आभार व्यक्त करतो. कोणत्याही व्यक्तीकडून स्केच मिळणे, जे त्याचे दुसरे आयुष्य जगत आहे, हे मन जिंकणारे आहे. हे यशस्वी ट्रान्सप्लान्ट वैद्यकीय पथकाद्वारे शक्य होऊ शकले आहे.”
खरं तर, एमएस धोनी पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएल 2023मध्ये खेळताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच धोनी रांचीच्या क्रिकेट स्टेडिअममध्ये सराव करताना दिसला होता. तो आयपीएलमध्ये पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्स संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बड्डे आहे भावाचा! सचिनने सेहवागला दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, इथेही केली सिक्सर मारण्याची विनंती
आख्ख्या जगाच्या शुभेच्छा एकीकडे अन् सूनबाईंच्या शुभेच्छा एकीकडे, मयंतीची अध्यक्ष बिन्नींंसाठी खास पोस्ट