Thursday, February 2, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शाहीन आफ्रिदीला सोडा, ‘हा’ गोलंदाज देऊ शकतो भारताला टेन्शन; माजी दिग्गजाने केले सावध

October 19, 2022
in T20 World Cup, क्रिकेट, टॉप बातम्या
Pakistan-Team

Photo Courtesy: Twitter/TheRealPCB


येत्या काही दिवसांमध्ये क्रिकेटप्रेमींना भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्याचा आनंद लुटण्याची सुवर्णसंधी लाभणार आहे. 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडमध्ये हा सामना पाहण्यासाठी जवळपास 1 लाख चाहते उपस्थित राहणार आहेत. मागील विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध झालेल्या दारुण पराभवाचा बदला भारतीय संघ घेण्याच्या विचारात असेल. अशात काही दिवसांमध्ये होणाऱ्या महत्त्वाच्या सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी हा दुखापतीतून पुनरागमन करत आहे. तसेच, तो भारतासाठी धोका असल्याचे म्हटले जात आहे.

शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) याला भारतासाठी धोका म्हटले जाण्यामागील कारण म्हणजे त्याने मागील वर्षी शानदार गोलंदाजी करत फलंदाजांना त्रास दिला होता. मात्र, भारतीय संघाचा माजी सलामीवीर आणि आताचा समालोचक आकाश चोप्रा (Aakash Chopra) याचा असा विश्वास आहे की, शाहीन आफ्रिदीपेक्षाही भारताला मोठा धोका वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ (Haris Rauf) याच्याकडून आहे.

आकाश चोप्राचे ट्वीट
आकाश चोप्रा याने ट्वीटमार्फत आपले मत मांडले आहे. तो म्हणाला की, “मला वाटते, रविवारी चिंता वाढवणारा गोलंदाज शाहीन नाहीये, तर तो हॅरिस रौफ आहे. आफ्रिदी सध्या त्याचे सर्वोत्तम देण्याच्या जवळ पोहोचत आहे, पण तो अजून तसे करू शकला नाहीये. अशात 23 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सामन्यात असे काही होण्याची शक्यताही नाहीये. दुसरीकडे, रौफ जबरदस्त गोलंदाजी करेल आणि त्याच्याकडे सामन्यात मोठा बदल करण्याची क्षमता आहे.”

But I do feel the bowler to be wary of on Sunday isn’t Shaheen. It’s Haris Rauf. Afridi is getting close to his best but isn’t there yet…and unlikely to be by the 23rd either. Rauf will bowl the tougher overs and has the potential to make a difference. #IndvPak #T20WorldCup

— Aakash Chopra (@cricketaakash) October 19, 2022

आशिया चषकातून बाहेर होता आफ्रिदी
शाहीन शाह आफ्रिदी दुखापतीमुळे आशिया चषकाचा भाग नव्हता. पाकिस्तानसाठी मागील काही महिन्यांपासून हॅरिस रौफ जबरदस्त गोलंदाजी करत आहे. पाकिस्तान संघात वेगवान गोलंदाज म्हणून त्याने शानदार कामगिरी केली आहे. यामध्ये आफ्रिदी आणि रौफव्यतिरिक्त युवा मोहम्मद हसनैन, नसीम शाह, मोहम्मद वसीम ज्युनिअर आणि शाहनवाज धानी उपस्थित आहे. हे सर्व गोलंदाज त्यांच्या गती आणि लाईन लेंथसाठी ओळखले जातात.

अशात भारत- पाकिस्तान सामन्यात कोणता संघ बाजी मारतो, हे पाहण्यासाठी चाहत्यांपासूनच अनेक दिग्गज खेळाडूही उत्सुक आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
याला काय अर्थय! रोवमनच्या चुकीमुळे सहकारी झाला बाद, वरून त्यालाच दाखवला आपला राग; पाहा व्हिडिओ
जमलंय बघा! विराट कोहलीने केली ‘पुष्पा’मधील सुपरहिट ऍक्शन, व्हिडिओ जोरदार व्हायरल
दुख, दर्द, पीडा! विश्वचषक खेळण्यासाठी सोडली मोठी ऑफर, पाकिस्तान संघातूनही सानियाचा पती बाहेर


Next Post
Sri Lanka Team

आता काय करायचं? एकाच दिवसात श्रीलंकेचे दोन खेळाडू विश्वचषकातून बाहेर; तिसराही त्याच वाटेवर

suresh raina

खूप होत आहे टीका, पण सुरेश रैना म्हणतोय, "त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये घ्याच"

Photo Courtesy: Twitter/Pro Kabaddi

प्रो कबड्डी: गुजरात-युपी सामन्यात गुणांचा पडला पाऊस; 'सदर्न डर्बी' बेंगलोरच्या नावे

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143