भारतीय संघाचे अनेक खेळाडू त्यांच्या कामातून वेळ काढून सोशल मीडियाचा आवर्जुन वापर करतात. यामध्ये युवा खेळाडूंपासून ते माजी खेळाडूंचाही समावेश आहे. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यासोबतच खेळाडू चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरेही देतात. अशाच एका प्रश्नाचे उत्तर भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याने देत सर्वांची मने जिंकली आहेत.
हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांना न निवडता भारताच्या माजी दिग्गजाचे नाव घेतले आहे. खरं तर, एका चाहत्याने हरभजनला टॅग करत विचारले की, क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील रोहित आणि विराटमध्ये कोण सर्वोत्तम कर्णधार आहे?
या प्रश्नाचे उत्तर देताना हरभजनने सर्वांना चकित केले. कारण, त्याने उत्तर देताना या दोघांच्याही नावाचा उल्लेख केला नाही. त्याने भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याचे नाव घेतले. खरं तर, धोनीच्या नेतृत्वात हरभजन दोन वेळा विश्वविजेत्या संघाचा भाग राहिला होता. 2007मध्ये पहिल्या टी20 विश्वचषकात भारताचा कर्णधार धोनी होता, त्यावेळी हरभजन भारताचा भाग होता.
https://twitter.com/harbhajan_singh/status/1629398801197985792
हरभजनच्या उत्तराने जिंकली चाहत्यांची मने
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या प्रश्नावर धोनीचे नाव घेऊन हरभजनने चाहत्यांची मने जिंकली आहेत. सोशल मीडियावर अनेक युजर्स या प्रतिक्रियेमुळे खुश आहेत. तसेच, मीम्स शेअर करत आहेत.
https://twitter.com/theprayagtiwari/status/1629405590077456385?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1629405590077456385%7Ctwgr%5Eff3899a0112f81ed97f2d5bac478fedd4e897944%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fbharat.republicworld.com%2Fsports-news%2Fcricket-news%2Fharbhajan-singh-choose-ms-dhoni-over-question-on-virat-kohli-rohit-sharma-fans-react
खरं तर, भारतीय संघाचा स्टार खेळाडू एमएस धोनी सध्या आयपीएल 2023 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. मागील वर्षी चेन्नईने काही सामन्यांसाठी अष्टपैलू रवींद्र जडेजा याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदीर सोपवली होती. मात्र, तो त्यामध्ये अपयशी ठरला होता.
आयपीएल 2023साठी चेन्नई संघ
खरेदी केलेले खेळाडू-
अजिंक्य रहाणे (50 लाख रुपये), बेन स्टोक्स (16.25 कोटी रुपये), शेख रशीद (20 लाख रुपये), निशांत सिंधू (60 लाख रुपये), काईल जेमीसन (1 कोटी रुपये), अजय मंडल (20 लाख रुपये), भगत वर्मा (20 लाख रुपये)
रिटेन करण्यात आलेले खेळाडू-
एमएस धोनी (कर्णधार), डेवॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, सुभ्रांशू सेनापती, मोईन अली, शिवम दुबे, राजवर्धन हंगारगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, रवींद्र जडेजा, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मथीशा पथिराना, सिमरजीत सिंग, दीपक चाहर, प्रशांत सोलंकी, महेश थीक्षणा (former cricketer harbhajan singh choose ms dhoni over question on virat kohli rohit sharma read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
समालोचन करताना पुन्हा घसरली गावसकरांची जीभ; प्रसिद्ध खेळाडूच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह विधान
दिनेश कार्तिकने झुंजार खेळी करूनही संघाच्या पदरी अपयश; फायनलमध्ये रिलायन्सचा शानदार विजय