सध्या भारतीय आजी माजी खेळाडूंनी खाजगीमध्ये खेळाडूंना लीगमध्ये खेळून देण्याची विनंती बीसीसीआयला केली आहे. यात इरफान पठाण, सुरेश रैना किंवा आरपी सिंगसारख्या खेळाडूंचा समावेश आहे.
तर बीसीसीआयतील काही अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार परदेशातील लीगमधे न खेळण्यामुळे भारतीय खेळाडू इतरांपेक्षा वेगळे ठरतात, असे कारण दिले आहे.
परंतु आता एकवेळचा आयपीएल स्टार मनप्रीत गोनीने या निर्णयावर सडकून टीका केली आहे. यावर भाष्य करताना गोनी म्हणाला की, खेळाडूंना आपला परिवार असतो. त्यांचा खर्च खेळाडूला उचलावा लागतो. देशांतर्गत क्रिकेटमधून जेवढा पैसा मिळतो, त्यातून घर चालवणे केवळ कठीण आहे.
गोनीने गेल्यावर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर तो कॅनडामधील लीगमध्ये खेळताना दिसला.
“भारतीय क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू आहेत, जे फक्त आयपीएलमध्ये खेळतात परंतु त्यांचे भारतीय संघात कोणतेही भविष्य दिसत नाही. काही खेळाडू असेही आहेत जे रणजी किंवा देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळतात परंतु त्यांना आयपीएलमध्ये त्यांना संधी मिळत नाही. अशा खेळाडूंना परदेशातील खाजगी लीगमध्ये खेळण्याची परवानगी दिली पाहिजे. कारण यामुळे त्यांना आपल्या परिवाराचे पालन पोषण करणे सोपे होईल, ” असे यावेळी गोनी म्हणाला.
जर खेळाडू जगातील अन्य कोणत्याही खाजगी लीगमध्ये खेळला तर त्याला भारत किंवा भारतात देशांतर्गत क्रिकेट खेळता येत नाही. भारतीय महिला क्रिकेटपटू मात्र परदेशातील खाजगी लीगमध्ये सहभागी होतात. ज्यात किया सुपर लीग किंवा बिग बॅशचा समावेश आहे. पुरुष क्रिकेटपटू फक्त इंग्लंडमधील काऊंटी क्रिकेटमध्ये प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतात. परंतु तिथे पैशांपेक्षा आपल्या कामगिरीत सुधारणा करण्यावर खेळाडूंचा भर असतो.
गोनी भारताकडून २ वनडे तर आयपीएलमध्ये ४४ सामने खेळला आहे. तो चेन्नई, डेक्कन, पंजाब व गुजरात संघाचा आयपीएलमध्ये सदस्य राहिला आहे.
वाचा- इंटरनॅशनल क्रिकेट न खेळताही खेळाडू कशी करतात कमाई?