Thursday, February 2, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उथप्पाचा भारतापेक्षा जास्त पाकिस्तानवर विश्वास? म्हणाला, ‘भारतीय चाहते खुश होणार नाहीत, पण…’

October 22, 2022
in T20 World Cup, क्रिकेट, टॉप बातम्या
Robin-Uthappa

Photo Courtesy: Twitter/T20WorldCup & bbci.tv


टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेचा महाकुंभमेळा ऑस्ट्रेलियात सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड येथे 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. मात्र, या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वीच माजी सलामीवीर फलंदाज रॉबिन उथप्पा याने टी20 विश्वचषकातील उपांत्य सामन्यांविषयी एक भविष्यवाणी केली आहे. त्याची भविष्यवाणी ऐकून प्रत्येकजण हैराण झाल्याशिवाय राहणार नाही.

खरं तर, रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) 2007 साली एमएस धोनी (MS Dhoni) याच्या नेतृत्वातील टी20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा भाग होता. मात्र, त्याने ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणाऱ्या संघांमधून भारतीय संघाला बाहेर ठेवले आहे. त्याच्या मते, यूएईत खेळल्या गेलेल्या मागील विश्वचषकाप्रमाणे यावेळीही भारतीय संघ साखळी फेरीतूनच बाहेर होईल आणि विजेतेपद जिंकण्याची प्रतीक्षा आणखी लांबणीवर पडेल.

रॉबिन उथप्पाची भविष्यवाणी
माध्यमांशी बोलताना 36 वर्षीय रॉबिन उथप्पा याने म्हटले की, “सुपर 12 फेरीच्या (Super 12 Round) दुसऱ्या गटातून अंतिम चार संघांमध्ये पाकिस्तान (Pakistan) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) संघ पोहोचतील.” पुढे बोलताना तो म्हणाला की, “मी एक पूर्वसूचना देऊन सुरुवात करू इच्छितो. मला वाटत नाही की, भारतीय चाहते खुश होतील, पण माझे उपांत्य फेरीत पोहोचणारे संघ ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका हे असतील.”

विशेष म्हणजे, रॉबिन उथप्पा याने केलेली भविष्यवाणी अनेक विश्लेषकांना हैराण करणारी होती. कारण, पॅनेलमध्ये उपस्थित असलेल्या अनेक लोकांनी भारतीय संघाला अंतिम चार संघांमध्ये स्थान दिले होते. पॅनेलच्या इतर सदस्यांमध्ये अनिल कुंबळे, सॅम बिलिंग्स, फाफ डू प्लेसिस, स्टीफन फ्लेमिंग, टॉम मूडी, परवेज महरूफ आणि डॅरेन गंगा यांचा समावेश होता. यांनी निवडलेल्या यादीत भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि इंग्लंड संघांना स्थान दिले होते.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लेट पण थेट! 2007 ते 2022, न्यूझीलंडने चार वेळा केला ऑस्ट्रेलियाचा दौरा, पण शेवटी ऑस्ट्रेलियाला लोळवलंच
डेविड वॉर्नरची विकेट टीम साऊदीसाठी ठरली ऐतिहासिक! केले ‘हे’ दोन विक्रम नावावर


Next Post
Photo Courtesy: Twitter/ICC

लाजिरवाण्या पराभवानंतर व्यथित झाला ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच; आपल्याच खेळाडूंना म्हणाला..‌.

Mohammed Shami Shaheen Afridi

मोहम्मद शमी की शाहीन आफ्रिदी? माजी विश्वविजेता कर्णधार म्हणाला, 'पाकिस्तानचा गोलंदाज खूपच.....'

Afg-vs-Eng

अवघडंय! अफगाणिस्तानच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद, दहाच्या दहा खेळाडूंवर ओढवली 'ही' नामुष्की

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143