टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील सर्वात महत्त्वाचा मानला जात असलेला सामना म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान होय. या सामन्यासाठी अवघ्या 10 मिनिटात 90 हजारांहून अधिक तिकीटे विकली गेली आहेत. या सामन्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सामना 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा माजी खेळाडू सुरेश रैना याने महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. त्याने अशा संघाचे नाव सांगितले आहे, ज्याला पराभूत करताच भारतीय आख्खी स्पर्धा जिंकण्याचा प्रबळ दावेदार ठरेल.
सुरेश रैनाची मोठी भविष्यवाणी
भारतीय संघाचा माजी खेळाडू सुरेश रैना (Suresh Raina) याने माध्यमांशी संवाध साधताना भारत- पाकिस्तानबद्दल चर्चा केली. यावेळी त्याने म्हटले की, “आपण पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना जिंकला, तर आपण विश्वचषक जिंकू. संघ चांगली कामगिरी करत आहे. मोहम्मद शमी याने जसप्रीत बुमराहची जागा घेतली आहे, ही संघासाठी निर्णायक गोष्ट ठरेल. विराट कोहली सध्या चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. दुसरीकडे, रोहित खूप चांगला नेतृत्वकर्ता आहे. आपण पहिला सामना जिंकला, तर हे आपल्यासाठी चांगली सुरुवात ठरेल.”
शमीबद्दल वक्तव्य
टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेपूर्वी दुखापतग्रस्त झालेल्या जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याच्या जागी मोहम्मद शमी (Mohammed Shami) याला भारतीय संघात सामील केले आहे. रैनाने शमीबद्दल बोलताना म्हटले की, “मी त्याला योग्य बदली खेळाडू म्हणणार नाही. कारण, तुम्ही बुमराह किंवा जडेजाची जागा घेऊ शकत नाही. ते सातत्याने भारतीय संघासाठी खेळले आहेत आणि त्यांनी चांगले प्रदर्शनही केले आहे. तुमच्याकडे सर्वात चांगला पर्याय होता, तो तुम्ही निवडला. शमीने चांगली कामगिरी केली आहे, तो चांगल्या फॉर्मात आहे.” ही बातमी एनडीटीव्ही वृत्तसंस्थेने दिली आहे.
सुपर 12मध्ये भारतीय संघाचे सामने
टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. त्यानंतर दुसरा सामना 27 ऑक्टोबर रोजी अ गटाच्या उपविजेत्या संघासोबत, तर तिसरा सामना 30 ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला जाईल. तसेच, चौथा सामना 2 नोव्हेंबर रोजी बांगलादेशविरुद्ध आणि पाचवा सामना 6 नोव्हेंबर रोजी ब गटाच्या विजेत्या संघाविरुद्ध खेळला जाईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारत- पाकिस्तान सामन्यात ‘या’ 5 गोष्टींवर असेल आख्ख्या जगाचं लक्ष, जाणून घ्या एका क्लिकवर
“टीम इंडिया विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याची शक्यता 30 टक्केच!”






