सध्या क्रिकेटविश्वात एक विषय चांगलाच चर्चेत आहे. तो म्हणजे, भारतीय संघाचे माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद आणि भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांचा. प्रसाद हे सोशल मीडियावर आपले परखड मत मांडताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर निशाणा साधला जात आहेत. मात्र, क्रिकेटच्या मैदानावर जबरदस्त बाऊंसर फेकण्यासाठी ओळखले जाणारे प्रसाद हे सर्वांची बोलती बंद करत आहेत. असेच एक ट्वीट त्यांनी अग्निवीर योजनेच्या विरोधात चालू असलेल्या प्रदर्शनाबद्दल केले आहे.
झाले असे की, एका युजरने देशभरातील विद्यार्थ्यांकडून केल्या जाणाऱ्या प्रदर्शनावर वेंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) यांना प्रश्न विचारले. या प्रश्नावर प्रसाद यांनीही सडेतोड प्रत्युत्तर दिले. त्यांनी ट्वीट करत लिहिले की, “ट्रेन आणि बसेस जाळणे हा निषेध करण्याचा कोणताही मार्ग असू शकत नाही. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण असेल, तर तुम्ही तुमचा मुद्दा शांतपणे मांडावा. हिंसक निदर्शने कधीही समर्थनीय असू शकत नाहीत आणि ज्यांनी ते केले त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. आता नुपूर शर्मा आणि इतरांच्या जीवाला जीवे मारण्याची धमकी मिळत आहे, त्या चर्चा बंद करा.”
Burning trains & buses is no way to protest. If you have issues, demonstrate peacefully. Violence is absolutely not done & severe action must be taken against everyone indulging in such acts.
Ab jo Nupur aur anya logon ko jaan ki dhamki mil rahi,uspar dahi jamaye ho, woh pighlao https://t.co/MSxZKw1Gv6
— Venkatesh Prasad (@venkateshprasad) June 17, 2022
पैंगबर मुहम्मद यांच्यावरील वक्तव्यानंतर व्यंकटेश प्रसाद यांनी भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्या उघड समर्थनार्थ उतरले आहे. बेळगावी येथील मशिदीबाहेर नुपूरच्या पुतळ्याला फासावर लटकवल्याबद्दल त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की, “हा २१व्या शतकातील भारत आहे यावर माझा विश्वास बसत नाही.” त्यांच्या एकामागून एक अनेक ट्विटवर काही लोकांनी त्याला टार्गेट करायला सुरुवात केली, तेव्हा संतापलेल्या व्यंकटेश यांनी त्यांच्या ट्विटला चोख प्रत्युत्तर दिले.
त्यांनी ट्वीट करत लिहिले होते की, “कर्नाटकातील नुपूर शर्मा यांचा हा लटकणारा पुतळा आहे. विश्वास बसत नाही की, हा २१व्या शतकातील भारत आहे. मी सर्वांना आग्रह करेल की, राजकारण सोडून ज्ञानी व्हा. हे खूप होत आहे.”
This is an effigy of Nupur Sharma hanging in Karnataka.
Simply cannot believe that this is 21st century, India.
I would urge everyone to leave politics aside and let sanity prevail. This is just too much. pic.twitter.com/Bl1K7Ke9qf— Venkatesh Prasad (@venkateshprasad) June 10, 2022
पुढे त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले होते की, “या ट्विटचा जो अर्थ आहे, तो अविश्वसनीय आहे. या परिस्थितीला वृत्तवाहिन्या तसेच अशा कारवायांना न्याय देणारे जबाबदार आहेत. हा केवळ पुतळा नसून कोणत्याही शब्दांशिवाय एकापेक्षा जास्त व्यक्तींसाठी धोका आहे.”
The whataboutery to this tweet is simply unbelievable. News channels along with justifiers and people indulging in whataboutery are significant contributors to the pitiful situation. This is not just an effigy By the way,but a threat to more than one person in no uncertain terms. https://t.co/xeLtajrvdB
— Venkatesh Prasad (@venkateshprasad) June 12, 2022
वेंकटेश प्रसाद यांची कारकीर्द
वेंकटेश प्रसाद यांनी भारतीय संघाकडून ३३ कसोटी सामना आणि १६१ वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी कसोटीत ५८ डावात २.८६च्या इकॉनॉमीने ९६ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, वनडेत त्यांनी १६० डावात गोलंदाजी करताना ४.६७च्या इकॉनॉमी रेटने १९६ विकेट्स घेतल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नाद नाद नादच! सर्वात मोठी धावसंख्या, सर्वाधिक षटकार, नेदरलँडविरुद्ध इंग्लंडने रचले अर्धा डझन विक्रम
आवेश खानने वडिलांना समर्पित केल्या आपल्या ४ विकेट्स, कारण जाणून तुम्हीही ठोकाल सलाम!