भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज खेळाडू गौतम गंभीर याने शुक्रवारी (दि. 14 ऑक्टोबर) 41व्या वयात पदार्पण केले. या खास दिनानिमित्त गंभीरवर चाहत्यांपासून ते आजी-माजी दिग्गजांकडून शुभेच्छांचा पाऊस पडला. यामध्ये माजी अष्टपैलू युवराज सिंग आणि सुरेश रैना यांचाही समावेश आहे. या दोघांच्याही शुभेच्छा लक्षवेधी ठरल्या. चला तर या दोन माजी दिग्गजांनी गंभीरला काय शुभेच्छा दिल्या आहेत, जाणून घेऊया…
युवराज आणि रैनाकडून शुभेच्छा!
गौतम गंभीर (Gautam Gambhir) याच्या वाढदिवसानिमित्त युवराज सिंग (Yuvraj Singh) आणि सुरेश रैना (Suresh Raina) यांनी त्याला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या. युवराजने गंभीरला खरा चॅम्पियन म्हटले, तर रैनाने त्याला खरा मित्र म्हटले.
युवराजने ट्वीट करत लिहिले की, “माझ्या लाडक्या भावा गौतम गंभीर, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तू प्रत्येक अर्थाने चॅम्पियन आहेस. तुला खूप जास्त प्रेम. आशा आहे लवकरच आपली भेट होईल.”
Wishing a very Happy Birthday to my dear brother @GautamGambhir – a champion in every sense! Lots of love GG. Hope to see you soon ❤️🤗 pic.twitter.com/qdz0xpajuc
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) October 14, 2022
दुसरीकडे, रैनानेही गंभीरला शुभेच्छा दिल्या. त्याने म्हटले की, “गौतम गंभीरला त्याच्या वाढदिवशी माझ्याकडून खूप खूप प्रेम. तो प्रत्येक गोष्टीत यशस्वी होईल अशी प्रार्थना करतो. तो एक चांगला मित्र आणि शानदार व्यक्ती आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा. तुझा दिवस चांगला जावो आणि हे वर्ष आनंदाने भरलेले असो.”
Wishing @GautamGambhir all the love and success on his Birthday today! A true friend and a gracious human being. Happy Birthday brother, have a great day and a fulfilling year ahead. pic.twitter.com/SOFCaFrPsc
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) October 14, 2022
युवराज आणि रैना गंभीरसोबत एकत्र खेळलेत क्रिकेट
युवराज सिंग आणि सुरेश रैना यांनी गंभीरसोबत अनेक वर्षे एकत्र क्रिकेट खेळले आहेत. या तिघांनी मिळून अनेक सामने भारतीय संघाला जिंकून दिले आहेत. गंभीर आणि युवराज 2007च्या टी20 विश्वचषकाचाही भाग होते. तसेच, संघाला चॅम्पियन बनवण्यात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले होते. नुकतेच गौतम गंभीर लिजेंड्स लीग क्रिकेट खेळतानाही दिसला होता.
गंभीरची कारकीर्द
संघ अडचणीत असताना गरज पडेल, तेव्हा गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने महत्त्वपूर्ण खेळी संघाला विजय मिळवून दिला. त्याने भारताकडून खेळताना त्याच्या कारकीर्दीतील 10000हून अधिक धावा चोपल्या. त्याने 2007च्या टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात 75 आणि 2011विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात 97 धावांची खेळी साकारली होती. गंभीरच्या महत्त्वपूर्ण खेळींमुळे भारतीय संघ विश्वचषक जिंकण्यात यशस्वी ठरला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दुखापत ‘या’ तिघांची पाठ काय सोडेना, आयपीएल 2022 नंतर आता यावर्षीचा टी-20 विश्वचषकही नाही खेळणार
बेन स्टोक्स! शॉट मारून हिरोगिरी करायला निघालेला ऑलराऊंडर धपकन आपटला, व्हिडिओ पाहाच