Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘राशिद खान असेल इंग्लंडसाठी सर्वात मोठा धोका’, माजी कर्णधाराने आधीच केले सावध

October 22, 2022
in T20 World Cup, क्रिकेट, टॉप बातम्या
Rashid-Khan

Photo Courtesy: Instagram/ICC englandcricket


शनिवारपासून (दि. 22 ऑक्टोबर) टी20 विश्वचषक 2022च्या सुपर 12 फेरीची सुरुवात झाली. या फेरीतील पहिला सामना न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात खेळला गेला. याच दिवशी दुसरा सामना इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान संघात खेळला जाणार आहे. पहिल्या गटातील या सामन्यापूर्वी इंग्लंडचा माजी दिग्गज कर्णधार ऑयन मॉर्गन याने जोस बटलर याच्या नेतृत्वातील इंग्लंड संघासाठी अफगाणिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरू शकतो, हे सांगितले आहे.

ऑयन मॉर्गन (Eoin Morgan) याच्या मते, अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान (Rashid Khan) हा इंग्लंड संघासाठी धोका ठरू शकतो. तो म्हणाला की, या सामन्यात राशिदची भूमिका सर्वात मोठी असेल. सोबतच त्याने जोस बटलर (Jos Buttler) विरुद्ध राशिद खान यांच्यात होणाऱ्या वैयक्तिक सामन्याबद्दलही आपली प्रतिक्रिया दिली.

आयसीसी विश्वचषक 2019च्या विजेत्या संघाचा कर्णधार राहिलेल्या मॉर्गनने राशिदबद्दल बोलताना म्हटले की, “इंग्लंडविरुद्ध माझ्यामते राशिद खान या सामन्यात विजय आणि पराभव यांच्यामध्ये उभा असेल. इंग्लंडचा सर्वोत्तम फलंदाज जोस बटलर आहे आणि त्याचा रेकॉर्ड राशिद खानविरुद्ध खूपच शानदार आहे. जर राशिद बटलरला लवकर बाद करू शकला, तर इंग्लंडसाठी या सामन्यात समस्या निर्माण होतील.” मॉर्गनच्या मते, राशिद आणि बटलरमध्ये होणाऱ्या वैयक्तिक सामन्यात खूप मजा येणार आहे आणि या दोघांपैकी जो हा सामना जिंकेल, तो सामना पलटू शकतो.

कर्णधार जोस बटलरही म्हणाला राशिद मोठा धोका
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर यानेही राशिद खानला या विश्वचषकात बाकीच्या संघांसाठी मोठा धोका म्हटले आहे. त्याने याविषयी म्हटले की, “हो, मी त्याला एक तगडा विरोधक मानत आहे. तुम्ही त्यांचा संघ पाहा, कारण या संघात काही शानदार खेळाडूही आहेत. ज्या टी20 संघात राशिद असेल, त्याला सोपे समजले नाही पाहिजे. आम्ही त्याला संपूर्ण सन्मान देत आहोत आणि आम्ही त्याच्याविरुद्ध एक शानदार सामना होण्याचे पाहत आहोत.”

सामना कधी होणार सुरू?
टी20 विश्वचषक 2022मधील सुपर 12 फेरीतील पहिल्या गटातील दुसरा सामना इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान संघात होणार आहे. या सामन्याला पर्थ येथे शनिवारी (दि. 22 ऑक्टोबर) 4.30 वाजता सुरुवात होणार आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मेलबर्नवरून आनंदाची बातमी, भारत-पाकिस्तान सामन्यावरील संकटाचे ढग दूर!
ऑस्ट्रेलियात लवकर येण्याचे कारण देताना रोहित म्हणाला, “आमचे खेळाडू आधीच…”


Next Post
Photo Courtesy:Twitter/Hotstar

याला म्हणतात सुरुवात! पहिल्याच सामन्यात ऍलनचा धमाका; फोडून काढली ऑस्ट्रेलियाची अनुभवी गोलंदाजी

Ben-Stokes

'आता मला राग येतोय', विश्वचषकातील 'बाऊंड्री रोप'वर भडकला स्टोक्स

team-india-2

टी20 विश्वचषकात 'हे' तीन संघ भारताला नेहमीच नडले, एक सुपर 12मध्ये गारद झाल्याने संकट टळले

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143