---Advertisement---

इंग्लंडच्या माजी कर्णधाराने केले विराटचे तोंडभरून कौतुक; म्हणाला, ‘विश्वचषकात त्याचा सामना करणे…’

Cricketer-Virat-Kohli
---Advertisement---

भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली याची ख्याती जगभरात पसरली आहे. आज असा एकही व्यक्ती सापडणार नाही, ज्याला कदाचित विराट कोहली याच्याविषयी माहिती नसेल. विराटने त्याच्या स्वभावाने आणि जबरदस्त फलंदाजीमुळे जगभरात मोठा चाहतावर्ग कमावला आहे. फक्त सामान्य व्यक्तीच नाहीत, तर दिग्गज क्रिकेटपटूही विराटचे चाहते आहेत. ते त्याचा आदरही करतात. यामध्ये इंग्लंड संघाचा माजी कर्णधार ऑयन मॉर्गन याच्या नावाचाही समावेश आहे. मॉर्गनने नुकतेच विराटविषयी मोठे भाष्य केले आहे.

ऑयन मॉर्गन (Eoin Morgan) याने विश्वास व्यक्त केला आहे की, वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) यासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत विराट कोहली (Virat Kohli) याचा सामना करणे सोपी गोष्ट नाहीये. मॉर्गनने याला विश्वास आहे की, जेव्हाही मोठा सामना असतो, तेव्हा विराटकडे आपले प्रदर्शन चांगले करण्याची जबरदस्त क्षमता आहे. त्याच्यानुसार, हा एक असा गुण आहे, जो फक्त खेळावर परिणाम करत नाही, तर त्याच्या संघसहकाऱ्यांवरही सकारात्मक प्रभाव टाकतो.

‘मी विराटचा खूप आदर करतो’
माध्यमांशी बोलताना मॉर्गनने विराटचे कौतुक करत म्हटले की, “मी विराट कोहलीचा दीर्घ काळापासून आदर करतो. हे फक्त त्याने केलेल्या धावांच्या संख्येमुळे नाही, तर हे मैदानात आणि मैदानाच्या बाहेर त्याच्या वर्तनामुळेही आहे.”

पुढे बोलताना मॉर्गनने म्हटले की, तुम्हाला मोठ्या स्पर्धेत त्याच्याविरुद्ध प्रतिस्पर्धा करू वाटणार नाही. कारण, तो अशा सामन्यांमध्ये आणखी चांगली कामगिरी करतो. विराटसारखा खेळाडू संघात असण्याचे महत्त्व सांगताना मॉर्गन म्हणाला की, “विराट कोहली याची संघातील उपस्थिती फायदेशीर आहे. कारण, तो 2011च्या विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य होता. तसेच, एमएस धोनी याच्या नेतृत्वाखाली तणावाच्या स्थितीचा कशाप्रकारे सामना करायचा, हे त्याला चांगलेच माहिती आहे.”

विश्वचषक कधी होणार सुरू?
वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेचे आयोजन 5 ऑक्टोबरपासून भारतात होणार आहे. या स्पर्धेचा पहिला सामना गतविजेत्या इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात खेळला जाणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये पार पडणार आहे. तसेच, भारतीय संघ विश्वचषकातील अभियानाची सुरुवात 8 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने करेल. हा सामना चेन्नईमध्ये पार पडणार आहे. (former england captain eoin morgan hails virat kohli says he is hard to compete with wc 2023)

हेही वाचा-
तो फॉर्ममध्ये परतला! श्रेयसने सराव सामन्यात चोपल्या ‘एवढ्या’ धावा, Asia Cupमध्ये काढणार पाकिस्तानचा घाम
नाद नाद नादच! यो-यो टेस्टमध्ये पास झाला ‘किंग’ कोहली; स्कोर पाहून तुम्हीही म्हणाल, ‘तू भारीच’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---