---Advertisement---

विरोधी संघातून कोहली अन् शास्त्रींना मोठा सल्ला, पंतबाबत सांगितली ‘ही’ महत्त्वपुर्ण गोष्ट

On: शुक्रवार, जुलै 23, 2021 5:12 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात येत्या ४ ऑगस्टपासून ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ कसून सराव करण्यात व्यस्त आहे. असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, या मालिकेत भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात रिषभ पंत मोलाची भूमिका बजावू शकतो. या मालिकेतील पहिला कसोटी सामना नॉटिंघमच्या ट्रेंट ब्रिज मैदानावर खेळला जाणार आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वी माजी इंग्लिश कर्णधाराने भारतीय कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना एक सल्ला दिला आहे.

भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत हा गेल्या काही महिन्यांपासून चांगल्याच फॉर्ममध्ये असल्याचे दिसून आले आहे. तो या मालिकेतही चांगली कामगिरी करेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अशातच इंग्लंड संघाचा माजी कर्णधार नासीर हुसेन यांनी रिषभ पंतच्या फलंदाजीबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी भारतीय कर्णधार विराट कोहली आणि रवी शास्त्री यांना रिषभ पंतच्या फलंदाजी क्रमाबाबत सल्ला दिला आहे. ( former england captain nasser hussain advice to indian captain virat kohli and coach ravi shastri)

नासिर हुसेन यांचा विराट आणि शास्त्रींना सल्ला 
रिषभ पंतची खेळण्याची एक वेगळीच  शैली आहे. त्याच्या फलंदाजीने चाहत्यांचे मनोरंजन होत असते. अशातच, नासीर हुसेन यांनी कोहली आणि रवी शास्त्री यांना सल्ला देत म्हटले की, “या २३ वर्षीय युवा फलंदाजाला ६ व्या नाहीतर, ७ व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी पाठवले पाहिजे.”

पंतची आक्रमक फलंदाजी शैली
यापूर्वी नासीर हुसेन यांनी म्हटले होते की, “रिषभ पंतची फलंदाजी शैली आक्रमक आहे. रवी शास्त्री आणि विराट कोहली यात बदल करू शकत नाही. त्यांनी हे विसरू नये की, रिषभ पंतला चांगली कामगिरी करताना पाहायच असेल तर, त्याला तेच करू द्या, जे त्याला करायचं आहे.”

महत्त्वाच्या बातम्या-

Video: नाणेफेक जिंकल्यानंतर उरला नाही ‘गब्बर’च्या आनंदाला पारावार, केले भन्नाट सेलिब्रेशन

रैनाच्या मी ब्राह्मणच्या कमेंटनंतर जडेजाच्या ‘त्या’ प्रतिक्रियेने उडाली खळबळ, झाला भरपूर ट्रोल

तब्बल चार दशकांनंतर एकाच वनडे सामन्यात ५ भारतीयांनी केले वनडे पदार्पण, पहिल्यांदा ‘या’ दिग्गजांना मिळालेला मान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---