भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची वनडे मालिका पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ६६ धावांनी विजय मिळवला होता. तसेच या सामन्यातून वनडे पदार्पण करणाऱ्या प्रसिद्ध कृष्णाने या सामन्यात ४ गडी बाद केले होते. त्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. नुकतेच इंग्लिश कर्णधाराने त्याचे कौतुक करताना माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडला याचे श्रेय दिले आहे.
राहुल द्रविड सध्या नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये डायरेक्टरची भूमिका पार पाडत आहे. अनेक युवा भारतीय क्रिकेटपटू पुढे आणण्यामागे द्रविडचे योगदान आहे. त्याने मागील काहीवर्षात १९ वर्षांखालीलन संघातील खेळाडू असो किंवा भारतीय अ संघाचे खेळाडू, या खेळाडूंना घडवण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली आहे. यात पृथ्वी शॉ, शुबमन गिल, इशान किशन ,रिषभ पंत,प्रसिद्ध कृष्णा यांसारख्या युवा खेळाडूंचा समावेश आहे.
इंग्लंड विरुद्ध झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात प्रसिद्ध कृष्णाला संधी देण्यात आली होती. या संधीचे सोने करत त्याने ४ महत्वाचे गडी बाद केले. यानंतर माजी इंग्लिश कर्णधार माइकल वॉनने प्रसिद्ध कृष्णावर स्तुतीसुमने उधळली आहेत.
प्रसिद्ध कृष्णाचे कौतुक करताना माइकल वॉन म्हणाला, “तो (प्रसिद्ध कृष्णा) एक चांगला खेळाडू आहे. या सामन्यात ज्याप्रकारे त्याने पुनरागमन केले, त्यावरूनच कळून येते की, तो कुठल्या प्रकारचा खेळाडू आहे. यामुळेच त्याच्यासारख्या गोलंदाजांना मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये संधी दिली जाते.”
राहुल द्रविडबद्दल बोलताना वॉन म्हणाला
“भारत पडद्यामागे जे काही करत आहे, त्यावरून आपण आयपीएललाच पुन्हा पुन्हा आठवतो. परंतु, मला असे वाटते की, राहुल द्रविड अ संघासोबत आणि डेवलपमेंट प्रोग्राम मार्फत खेळाडूंमध्ये योग्य मानसिकता विकसित करत आहे.”
तसेच तो पुढे म्हणाला,” या सर्व खेळाडूंना योग्य प्रणाली अंतर्गत आंतरराष्ट्रीय संघात आणले जात आहे. भारतीय संघाने जी प्रणाली विकसित केली आहे, त्याचे श्रेय त्याला मिळायला हवे. ते अगदी योग्य काम करत आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
पॉंटिंगच्या नजरेत भरला म्हणून भारतासाठी खेळला; वाचा अशोक डिंडाच्या आयपीएल एन्ट्रीची शानदार कहाणी
दुसऱ्या वनडेसाठी भारतीय संघात होऊ शकतात ‘हे’ तीन बदल; एका खेळाडूला वनडे पदार्पणाची संधी
“विराट पंचांवर दबाव आणतो”, इंग्लंडचा माजी खेळाडूचा आरोप