इंडियन प्रीमियर लीग 2021 स्पर्धेला 29 सामन्यानंतर कोरना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे स्थगिती देण्यात आली होती. परंतु, आता या हंगामातील उर्वरित सामने सप्टेंबर महिन्यात घेण्याचे निश्चित केले आहेत. परंतु, हे सामने सुरू होण्यास दोन महिन्यांचा कालावधी बाकी आहे. अशातच भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आपल्या परिवारासोबत वेळ घालवत आहे. धोनी कधी कुठे काय करत असतो या सगळ्याचे अपडेट त्याची पत्नी साक्षी सोशल मीडियाद्वारे देत असते. इतकेच नव्हे तर साक्षीने धोनीबाबतचा एक मजेदार किस्सा देखील सांगितला आहे.
साक्षी धोनीने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, धोनीला व्हिडिओ गेम खेळण्याची खूप आवड आहे. धोनीला व्हिडीओ गेमची इतकी आवड आहे की, तो रात्री मध्यरात्री गाढ झोपेत देखील PUBG म्हणजेच आताचे BGMI बद्दल बोलत असतो.
चेन्नई सुपर किंग्सने शेअर केलेल्या मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये साक्षीने सांगितले की, व्हिडिओ गेममुळे धोनीची नेहमी सक्रिय राहणारी बुद्धी दुसरीकडे व्यस्त होते. साक्षी पुढे म्हणाली की, सध्या व्हिडिओ गेम आमच्या खोलीमध्ये देखील घुसला आहे.
धोनीला जेव्हा रिकामा वेळ मिळतो, तेव्हा खोलीमध्ये गेम खेळत असताना कानामध्ये हेडफोन घालत बडबड करत असतो. इतकेच नव्हे तर साक्षी पुढे म्हणाली की, आता PUBG त्यांच्या बेडवर देखील आला आहे. कधी कधी साक्षीला असे वाटते की, धोनी तिच्या सोबत बोलत असतो. परंतु धोनी कानात हेडफोन घालून गेम खेळत लोकांसोबत बोलण्यात व्यस्त असतो. इतकेच नव्हे तर साक्षीने पुढे सांगितले की धोनी अनेक वेळा झोपल्यावर PUBG बद्दल बोलत असतो.
King 💛 Queen!
Some cute little #Yellove ly moments to make the day more special! 😍#WhistlePodu 🦁@msdhoni @SaakshiSRawat pic.twitter.com/AqUtIEeJ8G— Chennai Super Kings (@ChennaiIPL) July 4, 2021
काही दिवसातच धोनी मैदानावर दिसून येणार आहेत. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही तो आयपीएल खेळत असल्याने उर्वरित आयपीएल 2021 हंगाम सुरु झाल्यावर तो चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करताना दिसेल.
महत्त्वाच्या बातम्या –
“राहुल सरांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्यास उत्सुक”, युवा सलामीवीर झाला आनंदीत